
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय नेत्यांच्या विधानांनी आणि घडामोडींनी वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची परळी येथे प्रचारसा पार पडली. या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे म्हणाले, “परळीमध्ये अडचणीतील व्यक्तीला देवांच्याआधी माझा नंबर आठवतो.”, या विधानानंतर एकच चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय, धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा उल्लेख करत, इतकी मते मिळाली की मशीनलाही मोजायला कंटाळा आला, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे त्यांची मतदारसंघावरील पकड आणि लोकप्रियता अधोरेखित होते.
Leave a Reply