• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Devendra Fadnavis : ठाकरे गटासह मविआने निवडणूक सीरिअसली का लढवली नाही? मुख्यमंत्र्यांचं विचार करायला भाग पाडणारं उत्तर

December 21, 2025 by admin Leave a Comment


“2014 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत शहर आणि गावात भाजप विजयी झाला आहे. आमचा परफॉर्मन्स 2024 च्या लोकसभेत खाली गेला. तेव्हा मते कमी झाली नाही. त्यावेळी ग्रामीण भागात आम्हाला चांगली मते मिळाली. भाजप सर्व जाती आणि सर्व समाजाचा पक्ष आहे. महाराष्ट्राचा नंबर वन पक्ष भाजपच आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते महाराष्ट्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालावर बोलत होते. “आम्ही रत्नागिरीत महायुती म्हणून लढलो. यश मिळालं. सिंधुदुर्गात युती नव्हती. तिथे काही जागा जिंकलो, काही जागा हरलो. बाकी ठिकाणी आम्ही जिंकलो. आम्ही जिथे जिथे लढलो तिथे आमचा विजयच झाला आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार आहे. त्यामुळे ते बाहेरच पडले नाही किंवा कमी पडले. आता हरल्याचं लोकांना कळलं तर महापालिका आणि जिल्हा परिषदेत कार्यकर्त्याचं मोरल डाऊन होईल. आता ते सांगू शकतात की आम्ही निवडणुकीत उतरलो नाही. आम्ही सीरिअसली घेतलं नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडणुकीत काम न करणं हा करंटेपणा

“पण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही ताकदीने उतरलो. 10 हजार लोकसंख्येच्या गावात आम्ही गेलो. जे कार्यकर्ते लोकसभा आणि विधानसभेला निवडून आणतात. पण त्यांच्या निवडणुकीत काम न करणं हा करंटेपणा आहे. त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. तिथे आपली प्रतिष्ठापणाला न लावणं योग्य नाही. भाजप असं करत नाही. जिंकलो आणि हरलो तरी आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठी असतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या गावात राहण्यासाठी सरकार फुकट देतय 40 लाख रुपये, फक्त एकच अट…, असा करा अर्ज
  • Chandra Grahan 2026: पुढच्या वर्षी या सणाच्या मुहूर्तावर लागणार चंद्रग्रहण, १०० वर्षानंतर हा दुर्मिळ योग
  • WIND vs WSL 1st T20i : जेमीमाह रॉड्रिग्सची कडक खेळी, टीम इंडियाची विजयी सलामी, श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा
  • तुमच्याकडे पाहताच कुत्रा नेहमी का भुंकतो? अजिबात करू नका दुर्लक्ष; अन्यथा….
  • ‘धुरंधर’मधील रक्तपाताच्या, हिंसेच्या दृश्यांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, रामाने रावणाला..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in