• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cyclone Ditwah : पुढील 24 तास मोठ्या संकटाचे, IMD कडून पावसाचा रेड अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

November 30, 2025 by admin Leave a Comment


श्रीलंकेनंतर आता चक्रीवादळ डिटवाहने भारतात धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळामुळे उत्तर तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून तामिळनाडू,पाँडेचेरी, आणि आंध्र प्रदेशमधील अनेक भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ आता तामिळनाडूच्या किनारी भागांकडे सरकत आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर तामिळनाडू आणि पाँडेचेरीच्या किनारी भागाच्या जवळपास पोहोचलं आहे.गेल्या सहा तासांपासून हे चक्रीवादळ प्रति तास सात किमी वेगानं मार्गक्रमण करत आहे. पुढील 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ पुढील 24 तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ तामिळनाडू आणि पाँडेचेरीच्या किनार पट्टीला समांतर उत्तर दिशेनं पुढे सरकरण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे किनारी भागात मोठं नुकसान होणार असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून चक्रीवादळ प्रभावित भागांमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा तामिळनाडूला बसणार आहे, तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू सोबतच आंध्र प्रदेश आणि पाँडेचेरीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक राज्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळ डिटवाहाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी तापमानात घसरण होऊन थंडीचा कडाका देखील वाढू शकतो. तर विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतात हिंदू जास्त गरीब कि मुसलमान ? आश्चर्यकारक आकडेवारी समोर
  • महिलांमध्ये मोठ्या संख्येने वाढणारा ‘हा’ आजार बरा होऊ शकतो का? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
  • Ind vs Pak : PM मोदी की शरीफ, कोणाला मिळतो जास्त पगार?
  • टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहसोबत पहिल्यांदाच नको ते घडलं, एका षटकात…
  • Dhurandhar : धुरंधर चित्रपटाबाबत वाईट बातमी, एकाचवेळी सहा देशांमध्ये बंदी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in