
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, मात्र नंतर आपल्याला कळतं की आपली मोठी फसवणूक झाली आहे. समाजात असे अनेक लोक असतात जे आधी तुमचा विश्वास संपादन करतात आणि त्यानंतर ते त्यांच्या स्वार्थासाठी तुमची फसवणूक करतात, मात्र तोपर्यंत तुमच्या हातातून वेळ निघून गेलेली असते. अशा स्थितीमध्ये जेव्हा तुमची फसवणूक होते, तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही, तुम्हाला अशा व्यक्तींवर विश्वास केल्याचा पश्चाताप होतो, त्यामुळे हे टाळण्यासाठी समोरचा व्यक्ती हा प्रामाणिक आहे का? हे ओळखता आलं पाहिजे, त्यासाठी चाणक्य यांनी काही कसोट्या सांगितल्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
त्याग – चाणक्य म्हणतात जे व्यक्ती इतरांना आनंद मिळावा, म्हणून आपल्या सुखाचा त्याग करतात, त्या व्यक्ती प्रामाणिक असतात, त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेता कामा नये, अशा व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवू शकता, अशा व्यक्ती कधीही तुमचं नुकसान करणार नाहीत.
चारित्र्य – चाणक्य म्हणतात तुम्हाला जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत व्यवहार करायचा असतो, तर सगळ्यात आधी अशा व्यक्तीचं चारित्र्य तपासा, जर तो व्यक्ती कोणाबद्दलही कधीही वाईट चिंतीत नसेल तर असा व्यक्ती हा प्रामाणिक असतो.
गुण – चाणक्य म्हणतात गुण दोन प्रकारचे असतात, ज्यामध्ये चांगले गुण असतात, आणि दुर्गुण असतात, ज्या व्यक्तीला वाईट सवयी आहेत, जसं की आळस, समोरच्या व्यक्तीचा आदर न करणं, रागीट स्वभाव, जळावू वृत्ती तर अशा व्यक्तींवर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका, असे व्यक्ती धोकादायक असतात.
कर्म – चाणक्य म्हणतात जे लोक मेहनती असतात, ते लोक प्रामाणिक असतात, अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकतात, असे लोक कधीही तुमचं नुकसान करणार नाहीत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply