
कौटुंबिक भांडणे (Family Conflicts) – घरातील वाद आणि भांडणे इतर नातेवाईकांना सांगत बसू नका. या गोष्टी लोक नेहमीच गॉसिप बनून पसरवतात आणि समस्या आणखीनच वाढते.
मानसिक वेदना (Mental Pain) – आपल्या मानसिक दु:ख आणि वेदना कोणा नातलगाला सांगत बसू नका. प्रत्येक जण सुहानुभूती व्यक्त करेलच असे नाही. काही जण याचा हत्यार म्हणूनही वापर करु शकतात.
खरे प्रेम (True Love) – नातेवाईकांचे नाक खुपसणे नात्यात संशय आणि अंतर आणू शकते. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रेमाला जगाच्या नजरेपासून वाचवा. कोणालाही काही सांगू नका त्यामुळे तुम्ही सुरक्षित रहाल.
आपले उत्पन्न (Income) – आपले उत्पन्न नातेवाईकांना सांगितल्याने मत्सर, तुलना आणि नको असलेला दबाव वाढतो. त्यामुळे जितके कमी लोक तुमचे उत्पन्न जाणतील तेवढे तुमचे जीवन सुरक्षित होते.
जुना संघर्ष (Past Struggles) – कोणताही जुना संघर्ष, जुना अपमान, किंवा इतर भूतकाळातील कोणत्याही गोष्टी कोणाला सांगत बसू नका. कारण लोक तुमची मेहनत नाही तर तुमच्या कमजोरी लक्षात ठेवतात.
आपल्या भविष्यातील योजना (Life Plans) – आपल्या भविष्यातील योजनांचा बोभाटा करु नका. कारण तुमचे शत्रू सावध होतात आणि त्यात आडकाठी आणू शकतात.अपूर्ण स्वप्नांवर नकारात्मकता आणि संकटं लवकर येतात.
दूसऱ्यांशी तुलना – दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवा. त्यामुळे तुमची छबी आणि आत्मविश्वास दोन्हींना नुकसान पोहचू शकते.
दान आणि उदारता – कोणतेही दान शुद्ध तेव्हाच असते जेव्हा ते गुप्तपणे केलेले असते. सांगून केलेले दान फळत नाही. त्यामुळे तुमचे दान कोणाला सांगू नका.
तुमच्या कमजोरी – तुमच्या कमजोरी कोणालाही सांगत बसू नका. जर शत्रूला तुमची कमजोरी कळली तर त्याला तुमच्यावर वार करायला तलवारीची गरज लागणार नाही.
वाईट सवयी आणि उणिवा – तुमच्या वाईट सवयी आणि उणिवा जर तुम्ही मोकळेपणाने कोणाला सांगातल्या तर तुम्ही त्यांच्यात थट्टेचा विषय ठराल. त्यामुळे तुमची बदनामी देखील होऊ शकते.
अपूर्ण स्वप्नं – तुमच्या अपूर्ण स्वप्नांची माहिती सगळ्यांना देऊ नका. लोक तुमची थट्टा करुन तुमची प्रेरणा संपवू शकतात. त्यामुळे अपूर्ण स्वप्नांचाही उल्लेख कोणासमोर करु नका.










Leave a Reply