
चाणक्य हे महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही जीवन जगत असताना आपल्याला मार्गदर्शक ठरतात. आदर्श जीवन कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी असा टप्प्या येतो, त्या टप्प्यावर तो प्रचंड निराश होतो. खूप अस्वस्थ होतो. पुढची दिशा त्याला सापडत नसते, मात्र अशावेळी माणसानं खचून जाऊ नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात संयम नवाची अशी एक गोष्ट आहे, ही गोष्ट ज्या माणसाकडे असते, तो माणूस जग जिंकतो, त्यामुळे जेव्हा तुमच्या आयुष्याचा कठीण काळ चालू असतो, तेव्हा संयम ठेवा. लक्षात ठेवा कोणतीही वेळ बसून राहतं नाही, त्यामुळे तुम्ही जर हार न मानता संयम ठेवला तर एक दिवस यश नक्कीच तुमचं असेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
दु:खी माणसांसोबत राहू नका – चाणक्य म्हणतात तुम्ही कधीही अशा व्यक्तींसोबत राहू नका, जे कायम आपल्या समस्यांचं रडगाणंच गात राहतात, मात्र त्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्षात कोणताही प्रयत्न करत नाहीत. कारण तुम्ही जेव्हा अशा व्यक्तींसोबत राहतात तेव्हा त्यांच्या नकारात्मकतेचा प्रभाव हा हळुहळु तुमच्यावर पडतो आणि तुमचं देखील मोठं नुकसान होतं. त्यामुळे अशा व्यक्तींपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.
वाईट मित्रांपासून दूर रहा – चाणक्य म्हणतात तुमचा कितीही चांगला मित्र असला आणि जर त्याला एखादं व्यसन असलं तो जुगार खेळत असेल किंवा मद्यपान करत असेल तर अशा लोकांपासून लांबच रहा, त्यामध्येच तुमचं हीत आहे. कारण असे लोक कधीही सुधारत नाहीत, उलट त्यांच्यामुळे आपल्याला ती सवय लागण्याची शक्यता असते.
स्वप्नात जगू नका- चाणक्य म्हणतात स्वप्नात जगू नका, स्वप्न हेच सर्व दु:खाचं कारण आहे, त्यामुळे स्वप्नरंजन न करता वास्तवात जगा, आपण आपलं भविष्य कशापद्धतीनं उत्तम करू शकतो, याकडे लक्ष द्या.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply