
आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी निर्णय घेण्याचं कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात काय महत्त्व असतं, हे अनेक सोप्या उदाहरणातून सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात जे व्यक्ती आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, किंवा निर्णय घेण्यामध्ये अडखळतात, निर्णय घेण्यास विलंब करतात असे लोक त्यांच्या आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. कारण असे लोक जेव्हा निर्णय घेतात, तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असते, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं. योग्य निर्णय कसे घ्यावेत, याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
वेळ आणि प्राधान्य – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असतो, अशा वेळी तुमच्या हातात ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ आहे, आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे याचा विचार करा. समजा तुम्ही एखादी नवी योजना आखली, तर ती पूर्ण करण्यासाठी तुमच्या हातात किती वेळ आहे आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी सर्वात आधी कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्याची गरज आहे, हे ठरवा, तेव्हाच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
संसाधनाची उपलब्धता – चाणक्य म्हणतात एखादं काम करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या प्रकारची संसाधनं उपलब्ध आहेत, ते पाहून मगच पुढचा निर्णय घ्या, त्यामुळे तुम्हाला कामात अडथळा निर्माण होणार नाही, आणि तुमचं काम देखील पूर्ण होईल, तुम्ही घेतलेला निर्णय देखील योग्य असेल. जर तुमच्याकडे पर्याप्त संसाधनं असतील तरच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
योजनेची गुप्तता- चाणक्य म्हणतात जोपर्यंत तुमचं कार्य सिद्धीस जात नाही, पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमच्या योजना गुप्त ठेवा, त्या इतर कोणालाही सांगू नका. त्यामुळे तुमच्या निर्णयातील सर्वात मोठा अडथळा दूर होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply