
Border 2 : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांसोबत चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांनी डिस्चार्ज देखील मिळाला. पण धर्मेंद्र यांना घरी आणल्यानंतर अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भेटता देखील आलं नाही… असं अनेकदा सांगण्यात आलं. शिवाय निधनानंतर मुंबईत येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शोक सभेत अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहत श्रद्धांजली वाहिली. पण अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा, आहाना यांना दूर ठेवण्यात आलं.
त्यानंतर हेमा मालिनी यांनी दिल्ली धर्मेंद्र यांच्यासाठी शोकसभेचं आयोजन केलं. तेव्हा देओल कुटुंबातील एकही व्यक्ती हजर राहिला नाही. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबामध्ये वाद असल्याच्या चर्चा रंगल्या… पण आता एक मोठी गोष्ट समोर येत आहे… देओल कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या कुटुंबाला दूर ठेवलं. पण सावत्र भाऊ सनी देओल याच्यासाठी ईशा देओल हिने बहिणीचं कर्तव्य बजावलं आहे.
सांगायचं झालं तर, नुकताच सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ सिनेमा टीझर प्रदर्शित झाला आहे… सनी याने सोशल मीडियावर सिनेमाचा टीझर पोस्ट केला आहे. ज्यावर अन्य सेलिब्रिटींप्रमाणे ईशा हिने देखील लाईक केलं आहे. ही पहिली वेळ नाही, जेव्हा ईशा हिने बहिणीचं कर्तव्य बजावलं आहे. याआधी ‘गदर 2’ सिनेमा प्रदर्शित झालेला तेव्हा ईशा हिने सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं.

तेव्हा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अनेक वर्षांनंतर सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल आणि अहाना देओल एकत्र दिसले होते. तर सनी देओल याचा मुलगा करण देओल याच्या लग्नात देखील हेमा मालिनी दिसल्या नाहीत, पण ईशा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण याला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा देखील धर्मेंद्र यांच्या दोन्हा कुटुंबामध्ये वाद असल्याचं समोर आलं.
सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ सिनेमा
सध्या सर्वत्र सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमाता टीझर प्रदर्शित झाला आहे. आता चाहते ट्रेलर आणि त्यानंतर सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत… सिनेमात सनी देओल याच्यासोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply