
“कोणत्या जागा आपल्याकडे येतील आणि कोणत्या जागा भाजपकडे जातील याबाबत स्पष्टता नाही. युती होणार नाही, अशी शंका घेण्याचे कारण नाही. आपल्याकडेच वॉर्ड रहावा म्हणून ह्या मुलाखती आहेत. महायुतीचा झेंडा फडकेल.पुन्हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व सहकाऱ्यांची बैठक होईल. कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका सर्वांची आहे. काही ठिकाणी नाराजीचा सूर पहायला मिळतोय” असं मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट मुंबईतील युती संदर्भात म्हणाले. अजितदादा मुख्यमंत्री होतील, असं अमोल मिटकरी म्हणाले. राजकारणामध्ये संयम राखायचा असतो,ते आम्ही राखत आहोत असं संजय शिरसाट म्हणाले. सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, ‘तो तिचा पब्लिसिटीचा स्टंट आहे असा टोला लगावला’
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का?. ‘100 टक्के होतील, आम्हाला असं का वाटू नये’. “उद्धव ठाकरेंनी 6 सभा घेतल्या त्या खूपच जास्त झाल्या.तूच लढ ही भूमिका त्यांची राहिली आहे. हे इन्कामिंग वाले आहेत.आऊट गोइंग वाले नाहीत.आता त्यांना कार्यकर्ते मिळणार नाही,अनेकजण सोडून जाताहेत” असं उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेसंदर्भात शिरसाट म्हणाले.
काँग्रेसने नेहमी इंग्रजांची नीती वापरली आहे
“भाजप राज्यात मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादीने त्यांच्याशी बोलणे उचित समजले असेल किंवा जास्त जागा देत असतील. आमचा पक्ष छोटा आहे. जास्त मिळू शकणार नाहीत म्हणून त्यांच्याकडे गेले असतील” असं शिरसाट म्हणाले. “काही लोकांना काही उद्योग नसल्याने AI च्या माध्यमाने नेत्यांचे पैशांसोबतचे व्हिडिओ बनवले जात आहेत.दुष्मनीसाठी देखील व्हिडिओ बनविले जात आहेत. पारंपरिक मतदार उद्धव ठाकरेंकडे जाऊ नये म्हणून हे सर्व आहे.काँग्रेसने नेहमी इंग्रजांची नीती वापरली आहे” असं संजय शिरसाट म्हणाले.
“महाविकास आघाडीमध्ये सन्मान जनक याचा अर्थ काय होतो? जागा दिल्या नाही, यादी दिली नाही. सन्मानजनक हे वाक्य संभ्रमात टाकणारे आहे. ज्यांची पालखी घेऊन उद्धव ठाकरे गट जात होता, त्यांनीच यांची साथ सोडली आहे” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
Leave a Reply