
Harshvardhan Sapkal: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसला पहिला मित्र पक्ष मिळाला आहे. काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीसोबत त्यांनी युतीची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे सचिन सावंत तर वंचितकडून धैर्यवर्धन फुंडकर, सिद्धार्थ मोकळे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपविरोधात दोन्ही पक्ष एकत्र आल्याची भूमिका यावेळी जाहीर करण्यात आली.
संख्येचा खेळ नाही, विचारांचा मेळ
वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काँग्रेसचं नातं घट्ट होतं आहे.भारिप बहुजन महासंघ असं संघटनेचे नाव असताना काँग्रेस सोबत आघाडी होती. १९९९ पासून आम्ही सोबत नव्हतो पण २०२५ ला सोबत आहोत. २५ वर्षानंतर ही युती होत आहे.दोन नैसर्गिक पार्टनर्स आहेत.नैसर्गिक यासाठी कारण संविधान मानणं हा आमचा राजकीय अजेंडा आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक पार्टनर्स आहे. दोन्ही पक्षांमध्ये नैसर्गिक स्वरूपाचं नातं आहे. संविधान सभेची कामकाजात डीबेट नावाचा शब्द वापरला गेला. मतांमध्ये भिन्नता पण हेतू एकच होता. मतभिन्नता असेल तरी मन भिन्नता नाही.करुणा, समता, बंधूंता आहे. संविधानाशी तडजोड करणार नाही. मुंबईत वंचित आणि काँग्रेसची युती झाली आहे. तर इतर २८ ठिकाणी आमची युतीची चर्चा सुरू आहे. आज आम्ही समविचारी म्हणून मित्रपक्ष म्हणून राहतील. ही प्रक्रिया घडून आणायसाठी बराच काळ गेला. एक नवा अध्याय आम्ही लढत आहोत.हा संख्येचा खेळ नाही तर विचारांचा मेळ आहे. काँग्रेस स्थापना दिनी युतीची घोषणा होतेय. यात बरंच काही दडलंय. धैर्यवर्धन जी तुम्ही दाखवलेल्या धैर्यामुळे आमचाही हर्षवर्धन झालाय, अशी चपखल प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीला किती जागा?
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर यांनी मुंबईतील नवीन प्रयोगावर भाष्य केले. २०१४ मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या मानगुटीवर भाजप बसला नसता. असो आज भाजपला रोखण्यासाठी हा योग जूळून आलाय असे ते म्हणाले. सुजात आंबेडकर,सुमितजी यांनी पडद्यामागे बरीच मेहनत घेतली आहे. अधिकृत रित्या जाहीर करतोय की आम्ही काँग्रेस सोबत युती केली आहे. मुंबईत ६२ जागांवर आम्ही युतीत जागा लढत आहोत, असे फुंडकर यांनी जाहीर केले.
काँग्रेसच्या जागा गुलदस्त्यात
तर वंचित बहुजन आघाडीची आज युतीची घोषणा होतेय. एका नव्या पर्वाची सुरुवात होतेय. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन आहे. २२७ पैकी ६२ जागा वंचित बहुजन आघाडी लढणार आहे. सीट शेयरिंगच्या पेपरवर दोघांनी सह्या केल्या आहेत, असे सिद्धार्थ मोकळे यांनी जाहीर केले. पण या सर्व प्रक्रियेत काँग्रेस किती जागांवर लढणार हे मात्र गुलदस्यातच आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर समविचारी पक्षांशी बोलणी करत असल्याचे समोर येत आहे. त्यानंतर काँग्रेस किती जागांवर लढत आहे, हे समोर येण्याची शक्यता आहे.
Leave a Reply