
महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात (भाजप) इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांच्या प्रवेशामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. विशेषतः पुणे पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या अमोल देवळेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 15 ऑगस्ट रोजी सरकारच्या मांसबंदीच्या आवाहनाला विरोध करत देवळेकर यांनी मांस वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. अशा व्यक्तीला पक्षात घेतल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत आंदोलन छेडले. फक्त पुणेच नाही, तर नाशिकमध्येही अशीच परिस्थिती आहे. एकेकाळी दाऊदच्या हस्तकाशी संबंध असल्याचा आरोप ज्या सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपने केला होता, आता त्याच बडगुजर यांच्यासोबत काम करावे लागण्याच्या स्थितीत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पालघर हत्याकांडावरून भाजप ज्यांच्यावर टीका करत होती, त्याच व्यक्तीला पक्षात प्रवेश दिल्याने वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे भाजपने तो प्रवेश रद्द केला. भाजप नेते विकासाच्या धोरणांवर विश्वास ठेवून लोक पक्षात येत असल्याचा दावा करत असले तरी, या पक्षप्रवेशांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र कुचंबणा होत आहे.
Leave a Reply