• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bigg Boss 19 : ए लेस्बियन चल हट… लैंगिकतेवरून मालती सहन करतेय नको त्या गोष्टी

December 14, 2025 by admin Leave a Comment


Bigg Boss 19 : अभिनेता सलमान खान होस्टेट शो ‘बिग बॉस 19’ मध्ये झळकलेली अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मालती चाहर तुफान चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मालती हिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी मालती हिला लेस्बिनय म्हणून ट्रोल केलं… तर तिची खिल्ली देखील उडवली जात आहे.. सांगायचं झालं तर, मालती शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेली. घरात प्रवेश करताच मालती हिची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली.. पण काही दिवसांनंतर सर्व समिकरण बदललं.

घरात मालती हिला लेस्बियनचा देखील टॅग देण्यात आला… हा टॅग फक्त बिग बॉसच्या घरापर्यंत मर्यादित राहिला नाही. शोमधून बाहेर आल्यानंतर देखील लोकांनी मालतीकडे वाईट नजरेने पाहिलं… नुकताच झालेल्या मुलाखतीत मालती हिने यावर मोठा खुलासा केला आहे. मालती म्हणाली, ‘शोमधून बाहेर आल्यानंतर देखील लोक मला म्हणत आहेत की, ए लेस्बियन चल हट… आता मला लेस्बियन एक शिवी वाटत आहे…’

पुढे मालती म्हणाली, ‘जेव्हा मी मुलांसोबत बोलायची तर, माझं नाव त्यांच्यासोबत जोडलं जायचं… मुलींसोबत बोलू लागली तरी देखील चर्चा व्हायची… काहींतर माझ्या लैंगिकतेवर प्रश्न उपस्थित केले… पण कोणी मला येवून माझ्या लैंगिकतेबद्दल विचारलं नाही… मी स्पष्ट जे काही आहे ते सांगितलं असतं… फक्त अफवा पसरवण्यात आल्या…’

‘मला नाही वाटत की, लेस्बियन असणं वाईट आहे… जर कोणी लेस्बियन आहे तर आहे… असं असताना जर तुम्ही कोणाला कमी पणा दाखवत असाल, याठिकाणी तुमचे विचार दिसून येतात. मी बाहेर आली तरी लोकं मला म्हणत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये देखील चल हट लेस्बियन…’ असं देखील मालती म्हणाली.

मालती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहरची बहीण आहे. मालती 2018 मध्ये ‘जीनियस’ या सिनेमात दिसली होती. यासोबतच ती ‘सद्दा जलवा’ गाण्यातही दिसली होती. मालती सॉफ्टवेअर अभियंता असूनही तिने करिअर म्हणून अभिनय आणि मॉडेलिंगची निवड केली आहे. सोशल मीडियावरही तिची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. याचबरोबर मालती चहर 2014 मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या ‘एफबीबी फेमिना मिस इंडिया’ची सेकंड रनर अप होती. आता ‘बिग बॉस 19’ मुळे तिच्या लोकप्रियतेत  मोठी वाढ झाली आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुखच्या ‘या’ अभिनेत्रीचा प्रीती झिंटामुळे मोडला संसार? तिच्या पतीसोबत प्रीतीचे अफेअर असल्याचा आरोप
  • धुक्यात हरवले टॉवरचे जंगल, 23 व्या मजल्यावर मोबाईलने शुट केले विंहगम दृश्य, सोशल मीडियावर Video व्हायरल
  • चिकन खावं की मूग डाळ? जास्त प्रोटीन कशामध्ये; उत्तर वाचून चकितच व्हाल!
  • World 5 Tunnel Gratest Escape: मसूद अजहर ते एल चापो, तुरुंगात भुयार खोदून गेले पळून; भयानक दहशतवाद्यांची अंगावर काटा आणणारी स्टोरी!
  • सॅलरी स्लीप दाखवली तरच मिळणार दारू, नव्या आदेशाची जगात चर्चा; निर्णय कशामुळे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in