
शरद पवारांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. ही मागणी केवळ कार्यकर्ते म्हणून नव्हे, तर राज्यातील शेतकरी आणि बेरोजगारांची असल्याचे लंके यांनी म्हटले आहे. या मागणीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणे पवारांवर टीका केली. तर सदावर्ते यांनी या मागणीची खिल्ली उडवत, गिनीज बुकमध्ये नाव नोंदवण्याची मागणी करतील असे म्हटले. भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या हातात असतो. मागणी करणे हा लोकशाहीतला अधिकार असला तरी, अंतिम निर्णय सरकारचा असतो. आतापर्यंत ५३ व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यात महाराष्ट्रातील नऊ व्यक्तींचा समावेश आहे.
Leave a Reply