• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bangladesh Violence : भारताचा गेम करण्यासाठी ISI ने बांग्लादेशात मोठं कांड घडवलं का?

December 19, 2025 by admin Leave a Comment


बांग्लादेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेशात जनता रस्त्यावर उतरलीआहे. गुरुवारी रात्री चटगांव येथे भारतीय उच्चायोग कार्यालयाबाहेर जमलेल्या गर्दीने उच्चायोगावर दगडफेक केली. आंदोलकांनी भारत आणि अवामी लीग विरोधात घोषणाबाजी केली. शरीफ उस्मान हादी यांचा मृत्यू ज्या स्थितीत झाला, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, अनेक शक्यतांना वाव आहे. शरीफ उस्मान हादी हे आपल्या मतदारसंघात प्रचार करुन रिक्षाने घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. 12 डिसेंबर रोजी ढाका येथील पलटन भागात हादी हे बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षातून प्रवास करत असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत हादीला ढाक्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. नंतर 15 डिसेंबरला एअर एम्बुलेन्सने त्याला सिंगापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शरीफ उस्मान हादी यांच्यावर हल्ला कोणी घडवून आणला?. सध्या तरी या राजकीय हत्येमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा हात वाटतो. कारण सध्या हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेशात भारतविरोधी वातावरण निर्मिती सुरु आहे. भारताला विलनच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. उच्चायोगावर झालेली दगडफेकीची घटना हा त्याचाच एक भाग आहे. मागच्यावर्षी शेख हसीना यांना बांग्लादेश सोडून पळावं लागलं. त्यांना भारताने आसरा दिला आहे. याचा बांग्लादेशातील राजकीय नेते, राजकीय पक्ष यांच्या मनात राग आहे. तिथले नेते भारतविरोधी वातावरण निर्मिती करुन त्यांच्या लोकांना भडकवतात. त्यांना स्वत:ची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. शेख हसीना यांचे सुरुवातीपासून भारतात कुठलही सरकार असो, काँग्रेस किंवा भाजप त्यांच्याशी चांगले संबंध राहिले आहेत.

ISI चा हात असण्याची शक्यता का?

आता मोहम्मद यूनुस बांग्लादेशात अंतरिम सरकारचे प्रमुख आहेत. ते सत्तेवर आल्यापासून भारत-बांग्लादेशचे संबंध बिघडतायत. पण दुसऱ्याबाजूला चीन आणि पाकिस्तानचे संबंध सुधारत आहेत. भारत-बांग्लादेश संबंधात वितुष्ट चीन-पाकिस्तानला हवच आहे. पाकिस्तान बांग्लादेशला आपल्यासारख कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना तिथून भारतविरोधी कारवाया करता येतील. बांग्लादेशात काही दहशतवादी प्रशिक्षण तळही सुरु आहेत. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे, भारताला नुकसान पोहोचवणं. त्यामुळे शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूमध्ये सर्वात जास्त राजकीय फायदा आहे तो पाकिस्तानचा. म्हणूनच या हत्येमध्ये ISI हात असण्याची दाट शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेल्वेच्या वेटिंग लिस्ट आणि RAC तिकिटांबाबत मोठी अपडेट, रेल्वेने रातोरात बदलले नियम
  • वर्षाच्या शेवटच्या २० तारखेला राहा सावध! बनतोय मोठा अशुभ योग, चुकूनही करू नका ही ५ कामे
  • तैमूरच्या शाळेच्या कार्यक्रमात करीना खात होती समोसे; करण जोहरने पोस्ट केला व्हिडीओ
  • Mira Bhayandar Leopard : मीरा-भाईंदर हादरलं, इमारतीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, बघा VIDEO
  • Epstein Files: 1000 डॉलर एक रशियन मुलीचा रेट; एपस्टीन फाइलच्या नव्या फोटोंमुळे खळबळ! बिल गेट्ससह ट्रम्प यांचे फोटो व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in