• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Babar Azam : बाबरची गाडी घसरली, पाकिस्तानचा फलंदाज सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट

November 28, 2025 by admin Leave a Comment


पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याला गेल्या काही सामन्यांमध्ये सूर गवसला. बाबरने काही सामन्यांत मोठी खेळी केली. मात्र बाबरला हे सातत्य फार वेळ कायम राखता आलेलं नाही. बाबर पुन्हा त्याच ट्रॅकवर परतला आहे. बाबरने पुन्हा एकदा झिरोवर आऊट होण्याची मालिका सुरु केली आहे. (Photo Credit: Getty Images)

Pakistan Cricketer Babar Azam

बाबर टी 20i ट्राय सीरिजमधील सहाव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 185 धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरला. बाबर आला तसाच गेला. बाबरला भोपळाही फोडता आला नाही. श्रीलंकेचा गोलंदाज दुष्मंता चमीरा याने बाबरला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. (Photo Credit: PTI)

Babar Azam Duck

बाबर अवघ्या काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा याला मागे टाकत टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला होता. मात्र बाबर पुन्हा त्याच मार्गावर परतला. बाबरने श्रीलंकेविरुद्ध झिरोवर आऊट होताच नको त्या विक्रमाची बरोबरी केली. उमर गुल आणि सॅम अयुब याच्यानंतर बाबर टी 20i मध्ये दहाव्यांदा झिरोवर आऊट होणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला. (Photo Credit: Getty Images)

Babar Azam PAK vs SA

तसेच बाबरची टी 20i ट्राय सीरिजमधील झिरोवर आऊट होण्याची ही दुसरी वेळ ठरली. बाबर श्रीलंकेआधी झिंबाब्वे विरुद्धही भोपळा फोडण्यात अपयशी ठरला होता. तसेच बाबर गेल्या 30 दिवसांत तिसऱ्यांदा आणि 10 टी 20i सामन्यांत चौथ्यांदा झिरोवर आऊट झाला आहे. (Photo Credit: Getty Images)

Sri Lanka Cricket Team

दरम्यान श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही. श्रीलंकेने हा सामना 6 धावांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पुन्हा एकदा पाकिस्तान-श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. (Photo Credit: PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मेहुण्याची डिग्री लावून तीन वर्षे बनला होता हृदयाचा डॉक्टर, बहिणीने अचानक का पोल खोलली ?
  • मेहुण्याची डिग्री लावून तीन वर्षे बनला होता हृदयाचा डॉक्टर, बहिणीने अचानक का पोल खोलली ?
  • ‘लव्ह बॉम्बिंग’ म्हणजे काय? अचानक कोणी आवश्यकतेपेक्षा अधिक खास झाले का? जाणून घ्या
  • Pakistan Sanskrit : पाकिस्तानात थेट संस्कृत शिकवली जाणार, नव्या निर्णयाची चर्चा!
  • ‘मी लियोनल मेस्सीची…’, चाहत्यांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माफीनामा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in