
Nostradamus Baba Vanga Prediction: फ्रान्सचे भविष्यवेत्ते मिशेल द नास्त्रेदमस, भारताचे भविष्यवत्ते संत अच्युतानंद दास आणि बुल्गेरियाची भविष्यद्रष्टा बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीत एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते. त्यात हिंदू धर्माचा विविधे संकेतांनी उल्लेख करण्यात आला आहे. इतर ही अनेक भविष्यकारांनी हिंदू धर्माविषयी एक सार्वत्रिक भाकीत आढळते. हिंदू धर्माविषयीचे ते भाकीत कधीच बदलणार नाही, असा दावा करण्यात येतो. काय आहे त्यातील सत्य?
तो महान नेता कोण?
नास्त्रेदमस आणि अच्युतानंद दास यांच्या भविष्यवाणीत एक मोठे उल्कापिंड हे समुद्रात पडेल आणि अनेक देश समुद्रात बुडतील. म्हणजे मोठी त्सुनामी येईल असे संकेत देतात. तर बाबा वेंगाच्या मते मोठं महायुद्ध होईल आणि भारतात एक महान नेता जन्माला येईल. भारत हा महाशक्ती होईल. तर काहींच्या मते हे वक्तव्य चीनला सुद्धा लागू होऊ शकते.
हिंदू धर्माविषयी काय भाकीत?
नास्त्रेदमस: समुद्राच्या नावाशी साधर्म्य असलेला धर्म चंद्रावर अवलंबून असलेल्या धर्माच्या तुलनेत झपाट्याने जगभरात पोहचेल. दोन्ही धर्मात दीर्घकाळ वैचारिक युद्ध चालेल. काही ठिकाणी दोन्ही धर्मियांमध्ये झटापटी होतील. पण अखेरीस सर्व जातीचे, धर्माचे लोक एकाच धर्माला मानतील. एकाच विचाराने पुढे जातील.
तो महान व्यक्ती तीन समुद्र असलेल्या प्रदेशात जन्म घेईल. गुरुवार हा त्याचा सुट्टीचा दिवस असेल. त्याची लोकप्रियता, प्रसिद्धी आणि सत्ता दिंगतरी जाईल. सर्व समुद्र, जमिनीवर त्याची सत्ता चालेल.
पूर्वेतून तो नेता मध्य-पूर्वेतून थेट इटली आणि फ्रान्सपर्यंत पुढे येईल. लोक त्याची सत्ता स्वीकारतील. त्याच्याविरोधातील सर्व कटकारस्थानं हाणून पाडण्यात येतील.
अच्युतानंद: सर्वच श्रीकृष्ण भक्त होतील. रशिया एक हिंदू राष्ट्र होईल. रशियातील लोक भगवान जगन्नाथ यात्रेसाठी येतील. देशाच्या गादीवर एक अविवाहित संत येईल. त्याचा प्रभाव विश्वभर असेल. त्याच्या शासन काळात जगात सनातन धर्म आगी सारखा पसरेल.
रोमा रोला: फ्रान्सची नोबेल विजेता आणि दार्शनिक रोमा रोला यांनी एकदिवस जगाला हिंदू धर्मापुढे नतमस्तक व्हावे लागेल असं म्हटलं आहे. आपण युरोप, अरब आणि मध्य-पूर्वेतील अनेक दर्शनशास्त्र, धर्मग्रंथ आणि विचारांचा अभ्यास केला आहे. पण हिंदू धर्माइतके प्रभावशाली विचार कुठेच नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
Leave a Reply