
टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचेपर्यंत जबरदस्त कामगिरी केली. भारताने साखळी फेरीत सलग आणि एकूण तिन्ही सामने जिंकले. भारताने साखळी फेरीत यूएई, पाकिस्तान आणि मलेशिया या तिन्ही संघांवर मात केली. भारताने यासह उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. भारतासमोर उपांत्य फेरीत श्रीलंकेचं आव्हान होतं. भारताने श्रीलंकेवर 8 विकेट्सने दणदणीत आणि एकतर्फी विजय साकारला. भारताने यासह अंतिम फेरीत धडक दिली. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं. त्यामुळे चाहत्यांना साखळी फेरीनंतर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याचा थरार पाहायला मिळणार होता.
भारत आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये कोण जिंकणार? याची चाहत्यांना उत्सूकता होती. तसेच या सामन्यात टीम इंडियाची युवा आणि विस्फोटक जोडी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती. मात्र भारताच्या फलंदाजांसह गोलंदाजांनी निराशा केली. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर एकतर्फी आणि दणदणीत विजय साकारला.
भारताचा अंतिम सामन्यात पराभव
समीन मिन्हास याने 172 धावांच्या खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 347 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे टीम इंडियाला 348 धावांचं आव्हान मिळालं. मात्र टीम इंडियाचे फलंदाज ढेर झाले. पाकिस्तानसमोर भारताला प्रत्युत्तरात टीम इंडियाला 160 धावाही करता आल्या नाहीत. पाकिस्तानने भारताला 26.2 ओव्हरमध्ये 156 रन्सवर ऑलआऊट केलं. पाकिस्तानने अशाप्रकारे 191 धावांनी हा सामना जिंकला आणि आशिया कपवर नाव कोरलं. भारताच्या या पराभवानंतर कर्णधार आयुष म्हात्रे याच्यावर टीका केली जात आहे.
भारताच्या या पराभवासाठी कॅप्टन आयुषचा एक निर्णय हा कारणीभूत असल्याचा दावा चाहत्यांकडून सोशल मीडियाद्वारे केला जात आहे. नेटकऱ्यांचं नक्की म्हणणं काय आहे? जाणून घेऊयात.
फिल्डिंग करण्याचा निर्णय चुकला!
या महाअंतिम सामन्यात भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार आयुषने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आयुषचा फिल्डिंगचा निर्णयच भारतावर भारी पडल्याचं म्हटलं जात आहे. आयुषने फिल्डिंगचा निर्णय घेऊन भारताचा पराभव ओढावून घेतल्याचं म्हटलं जातंय.
बॅटिंगसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर आयुषने टॉस जिंकूनही फिल्डिंगचा निर्णय घेतला पाकिस्तानने या संधीचा फायदा घेत धमाका केला. पाकिस्तानसाठी समीर मिन्हास याने 172 धाला केल्या. पाकिस्तानने त्या जोरावर 347 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या फलंदाजांनी ज्या खेळपट्टीवर 350 पार मजल मारली, त्याच मैदानात भारतीय फलंदाज मात्र अपयशी ठरले. त्यामुळे कदाचित आयुषने फिल्डिंगऐवजी बॅटिंगचा निर्णय घेतला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.
Leave a Reply