
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने मायदेशात इंग्लंड विरूद्ध प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजमध्ये (Ashes Series 2025-2026) विजयी घोडदौड कायम राखली आहे. ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथ याच्या नेतृत्वात 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांत दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 21 डिसेंबरला पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात तिसर्या सामन्यात इंग्लंडचा 82 धावांनी धुव्वा उडवत विजयी हॅटट्रिक केली. ऑस्ट्रेलियाने यासह मालिका नावावर केली. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने एकतर्फी आघाडी घेतलीय. तसेच ऑस्ट्रेलिया ही ट्रॉफी आपल्याकडे कायम राखण्यात यशस्वी ठरलीय.
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 435 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडनेही जोरदार झुंज दिली. मात्र इंग्लंडला 352 धावांपर्यंतच पोहचता आलं. इंग्लंडने अशाप्रकारे सामन्यासह मालिका गमावली. विकेटकीपर एलेक्स कॅरी हा तिसऱ्या विजयाचा हिरो ठरला. कॅरीने या सामन्यात एकूण 178 धावा केल्या. तसेच 6 कॅचही घेतल्या.
इंग्लंडचं 11 दिवसांत काम तमाम
ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकत पाहुण्या इंग्लंडचा 11 दिवसांत हिशोब केला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 11 दिवसांत आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना हा पाचव्या दिवशी जिंकला.
ऑस्ट्रेलियाने त्याआधी पर्थमध्ये झालेल्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा दुसऱ्याच दिवशी धु्व्वा उडवला होता. ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात इंग्लंडला 8 विकेट्सने पराभवाची धुळ चारली होती. तर ब्रिस्बेनमधील दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी चौथ्या दिवशी इंग्लंडवर मात केली होती. ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेनमधील सामनाही 8 विकेट्सने आपल्या नावावर केला होता. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे इंग्लंडचा 11 दिवसांत हिशोब करत मालिका जिंकली.
ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम
दरम्यान ऑस्ट्रेलियाने या विजयासह या प्रतिष्ठेच्या मालिकेत आपला दबदबा कायम राखला आहे. ऑस्ट्रेलियाची ही मालिका जिंकण्याची सलग 5 वी वेळ ठरली. ऑस्ट्रेलियाने 2017-18 साली एशेज सीरिज जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2019 साली ही मालिका आपल्या नावावर कायम राखली. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर 2021-22, 2023 आणि त्यानंतर आता 2025-26 ही मालिका जिंकण्याची मालिका कायम ठेवली आहे.
Leave a Reply