• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Auction: 7 खेळाडूंना मोठा झटका, फिक्सिंगच्या आरोपामुळे ऑक्शनमधून नाव हटवलं! करियर धोक्यात?

November 29, 2025 by admin Leave a Comment


बीपीएल अर्थात बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी लवकरच ऑक्शन होणार आहे. मात्र ऑक्शनच्या बरोबर 7 दिवसांआधी 7 खेळाडूंना मोठा झटका लागला आहे. या 7 खेळाडूंची नावं ड्राफ्टमधून हटवण्यात आली आहेत. या खेळाडूंवर फिक्सिंगचा आरोप आहे. (Photo Credit : Instagram)

Bangladesh Cricket

धक्कादायक म्हणजे या 7 खेळाडूंमध्ये 2 स्टार क्रिकेटपटूंचा समावेश आहे. फिक्सिंगचा आरोप असलेल्या या 7 खेळाडूंमध्ये मिजानुर रहमान, निहादुज्जमान, सुनजामुल इस्लाम, अनमुल हक बिजॉय, मोसद्देक हुसैन, अलाउद्दीन बाबू आणि शोफिउल इस्लाम यांचा समावेश आहे. (Photo Credit : Instagram)

Bangladesh Cricket Fixing

बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याआधीच 10 खेळाडूंना ते रेड झोनमध्ये असून त्यांना ऑक्शनमधून वगळण्यात येऊ शकतं, असे संकेत दिले होते. (Photo Credit : Instagram)

anamul haque bijoy

बीसीबीने वगळलेल्या 7 खेळाडूंमध्ये अनमुल हक बिजॉय याचा समावेश आहे. अनमुल हा कॅप्ड खेळाडू आहे. अनमुल याने बांगलादेशचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. अनमुल 8 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 20 टी 20i सामने खेळला आहे. (Photo Credit : Instagram)

Anamul Haque Bijoy Bpl Career

अनमुल हक बिजॉय याने बीपीएल स्पर्धेत आतापर्यंत 131 सामने खेळले आहेत. अनमुलने या दरम्यान 2 हजार 776 धावा केल्या आहेत. अनमुलने या दरम्यान 1 शतक आणि 16 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : Instagram)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mahayuti Alliance : मलिकांमुळे महायुतीतून ‘दादा आऊट’, भाजप अन् राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय?
  • ‘लक्ष्मी निवास’मधल्या ‘त्या’ भूमिकेवर चिडले नेटकरी; म्हणाले ‘आधी तिला काढून टाका’
  • तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून ‘बूट’ द्यायचे आहेत का? पण धार्मिक श्रद्धेनुसार ते शुभ आहे की अशुभ?
  • Manikrao Kokate : रमीपासून ढेकळाच्या पंचनाम्यापर्यंत… महाराष्ट्राला संताप आणणारी माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधाने कोणती ?
  • Pahalgam Attack : पहलगामचा हल्ला हे भारत सरकारचंच षडयंत्र; अभिनेत्रीच्या दाव्याने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in