
एलेक्स कॅरीने अॅडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या एशेज मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतक झळकावले. या शतकासह त्याने एक विक्रम रचला आहे. (फोटो- AFP)
इंग्लंडविरुद्धच्या एडलेड कसोटीच्या पहिल्या डावात अॅलेक्स कॅरीने 143 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 1 षटकार होता. त्याने 135 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.हे त्याच्या कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक होते. (Photo: PTI)
एलेक्स कॅरीने इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच शतकी खेळी केली आहे. इंग्लंडविरुद्ध ही एलेक्स कॅरीची सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी कधीच तिहेरी आकडा गाठलेला नाही. (Photo: PTI)
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार विकेट 100 धावांच्या आत पडल्या होत्या. त्यानंतर एलेक्स कॅरी फलंदाजीला आला आणि त्याने डाव सावरला. यात 72 धावांवर असताना त्याला नशिबाची साथ मिळाली. एलेक्सने इंग्लंडला बॅकफूटवर ढकलण्यात यश मिळवले. (फोटो- AFP)
एलेक्स कॅरीने त्याच्या खेळीदरम्यान तीन अर्धशतकी भागीदारी केली. उस्मान ख्वाजासोबत पाचव्या विकेटसाठी 91 धाव, जोश इंग्लिससोबत सहाव्या विकेटसाठी 59 धावा आणि स्टार्कसोबत आठव्या विकेटसाठी 50 धावा केल्या. या तीन भागीदारींमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 326 धावांचा पल्ला गाठला. (फोटो- GETTY)




Leave a Reply