
ख्रिसमसचा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या खास प्रसंगी अनेक सेलेब्रिटींनीही घरी पार्टीचे नियोजन केले होते. प्रसिद्ध पंजाबी सिंगर एपी ढिल्लोनचा मुंबईत कॉन्सर्ट आयोजित केला होता. बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तसह अनेक स्टार्स प्रसिद्ध पंजाबी सिंगर एपी ढिल्लोनच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचले होते. संजय दत्तने कॉन्सर्टमध्ये शानदार एंट्री घेतली होती. दुसरीकडे अभिनेत्री तारा सुतारियानेही एपीसोबत स्टेज शेअर केला. दरम्यान, एपीने तिला किस केले. ते पाहून ताराचा बॉयफ्रेंड, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीर पाहाडीया पाहातच बसला.
एपी ढिल्लोन सध्या ‘वन ऑफ वन’ टूर करत आहेत. याच दूर दरम्यान त्याने २६ डिसेंबरला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शो आयोजित केला असून त्यात परफॉर्म केले. येथे हजारो लोकांची गर्दी त्याला पाहण्यासाठी जमली होती. बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सची उपस्थितीने त्याचा हा शो आणखी खास बनवला होता. या कॉन्सर्टमध्ये असा एक क्षणही आला जेव्हा तारा सुतारियाने सर्वांचे लक्ष वेधले. ती स्टेजवर ढिल्लोनसोबत जबरदस्त डान्स करताना दिसली आणि याचवेळी सिंगरने अभिनेत्रीला किस करून टाकले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
एपी ढिल्लोनने तारा सुतारियाला केले किस
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एपी ढिल्लोन पांढऱ्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तर तारा सुतारिया ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहेत. कॉन्सर्टच्या मध्यभागी तारा स्टेजवर पोहोचते आणि एपी ढिल्लोनच्या गाण्यावर थिरकताना दिसते. दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि त्यानंतर ढिल्लोन अभिनेत्रीला किस करतो. त्यानंतर सिंगर ताराचा हात धरून तिला स्टेजच्या पुढच्या बाजूला घेऊन जातो.
आश्चर्यचकित होऊन बघत राहिला वीर पहाडिया
सोशल मीडियावर तारा आणि एपी ढिल्लोनचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला तारा सुतारियाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता वीर पहाडियाच्या रिअॅक्शनने आणखी खास बनवले आहे. वीर थोडा आश्चर्यचकित होताना दिसला आहे. तसेच तो तोंडातल्या तोंडात गाणेही गुणगुणताना दिसत आहेत. चाहते या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत.
Leave a Reply