• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

American Tariff : अमेरिकेतून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, टॅरिफबाबत मोठी बातमी

December 13, 2025 by admin Leave a Comment


भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, काही महिन्यांपूर्वीच या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती, अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी ट्रेड डील होणार आहे, या ट्रेड डीलची बोलणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत, मात्र अमेरिकेनं लावलेला टॅरिफ यामध्ये अडथळा ठरत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांचं नुकसान झालं आहे, मात्र याचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेलाच बसल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेत होणाऱ्या भारतीय वस्तुंची निर्यात कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून सध्या अमेरिकेत अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत असून, महागाई देखील वाढली आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफचा आता पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये मोठा उद्रेक पहायला मिळत आहे. भारतावर लावलेल्या टॅरिफच्या निर्णयाविरोधात आता अमेरिकेच्या संसदेमध्येच आवाज उठवला गेला आहे. अमेरिकेच्या तीन खासदारांकडून भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफविरोधात एक प्रस्ताव तेथील संसदेमध्ये सादर करण्यात आला आहे. डेमोक्रेटिक पार्टीचे तीन खासदार डेबोरा रॉस, मार्क वीसी आणि मुळ भारतीय वंशाचे असलेले खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी हा प्रस्ताव संसदेमध्ये सादर केला आहे. अमेरिकेनं ऑगस्ट 2025 मध्ये भारतावर जो अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला आहे, तो हटवण्यात यावा अशी मागणी या प्रस्तावामध्ये करण्यात आली आहे, हा डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशात मोठा झटका मानला जात आहे.

दरम्यान या खासदारांनी असा देखील आरोप केला आहे की, काँग्रेसची परवानगी न घेताच या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेचं मोठं नुकसान होत आहे, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हा टॅरिफ हटवण्यात यावा अशी मागणी होत आहे, तर दुसरीकडे अशी देखील माहिती समोर येत आहे की, भारत आणि अमेरिकेमध्ये मोठी ट्रेड डील होणार आहे, यासंदर्भातील बोलणी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्यामध्ये टॅरिफचा मुद्दा आता अडचण ठरला आहे, त्यामुळे ट्रम्प काय निर्णय घेणार? याकडे संर्वांचं लक्ष लागलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आलिया भट्ट जाणार पाकिस्तानमध्ये? चाहत्याच्या प्रश्नाचे काय दिले उत्तर वाचा
  • DSP कल्पना यांचा खरंच 2 कोटींचा लव्ह ट्रॅप? व्यावसायिकाने काय गेम केला? पहिल्याच खुलाशाने उडवून दिली खळबळ!
  • Indigo Crisis : इंडिगोवर सर्वात मोठ संकट असताना नेदरलँडमध्ये CEO च काय चाललय? व्हिसलब्लोअरचा धक्कादायक दावा
  • Bharat Ratna for Sharad Pawar: NCP खासदाराची शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते अन् पडळकरांनी उडवली खिल्ली
  • डोअरमॅट ‘या’ चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास अडथळा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in