
Ambani Family Fitness coach : जगातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आज त्यांच्या कुटुंबियांसोबत आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहेत. त्यामुळे अंबानी कुटुंबाच्या चर्चा देखील कायम सोशल मीडिया आणि लोकांमध्ये सुरु असतात. आता अंबानी कुटुंबियांच्या फिटनेसबद्दल चर्चा सुरु आहे. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना याच्या खांद्यावर मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांच्या फिटनेसची जबाबदारी आहे. विनोद आज फिटनेस विश्वातून कोट्यवधींचा माया कमावतो. पण एक वेळ अशी होती, त्याला कुटुंबाची भूक भागवण्यासाठी झाडू आणि फर्शी पुसण्याचं देखील काम करावं लागलं…
विनोद चन्ना यांनी आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना फिटेनेस ट्रेनिंग दिली आहे. जॅकलीन, जॉन अब्राहम, हर्षवर्धन राणे, रितेश देशमुख, शिल्पा शेट्टी यांसारख्या अनेकांना विनोद यांनी फिटनेस ट्रेनिंग दिली आहे… तर मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांना देखील विनोद याने फिटनेस टिप्स दिल्या आहे… ज्यामुळे त्यांचं वजन कमी झालं…
एका मुलाखतीत खुद्द विनोद यांनी सांगितलं होतं की, ते अंबानी कुटुंबाचे फिटनेस ट्रेनर आहेत. अशात लोकांच्या मनात एक प्रश्न कायम येत असेल आणि तो म्हणजे, विनोद अंबानी यांच्याकडून किती फी घेत असेल. विनोद याच्या फीचा आकडा ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल…
विनोद चन्ना याने एक मुलाखतीत सांगितल्यानुसार, ‘माझे ट्रेनिंग सेशल पूर्ण जगात ऑनलाईन सुरु असतात… ऑनलाईन 12 सेशन्सची मी 1 लाख रुपये चार्ज करचो… याशिवाय, जर कोणी माझ्या जिममध्ये येत असेल किंवा मला तिथे बोलावत असेल, तर अंतर आणि माझा किती वेळ जात आहे यावर अवलंबून, मी दरमहा 1.5 लाख, 2.5 लाख आणि 3 लाख रुपये आकारतो. ‘
‘फिटनेस ट्रेनिंगसाठी ज्यांना माझी गरज असते, त्यांच्यासोबत मी ट्रॅव्हल देखील करतो… अशात ते मला दिवसाची लाखो रुपये फी देतात… सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना व्यायामासाठी वेळ नसल्याने त्यांच्याकडे अधिक समस्या येतात. त्यामुळे, ते कुठेही असले तरी, त्यांना चांगली संधी आहे हे स्पष्ट आहे.’ असं खुद्द विनोद चन्ना म्हणालेला.
हाउस किपिंगचं देखील केलंय काम…
विनोद हा मुंबईतील एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. लहानपणापासूनच गरिबी आणि जबाबदाऱ्या त्याला सतावत होत्या आणि त्याची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची होती की तो त्याचे शिक्षण पूर्ण करू शकला नाही. सुरुवातीला तर त्याने झाडू – फरशी पुसण्याचं देखील काम केलं… ज्यामुळे तो कुटुंबाची भूक भागवत होता आणि जीम ट्रेंनीग करायचा…
विनोद याने पहिली नोकरी जिममध्ये फ्लोअर ट्रेनर म्हणून होती, ज्यातून त्याला 600 – 700 रुपये मिळत होते. दिवसभर मशीन साफ करणे आणि प्लेट्स लोड करणे आणि अनलोड करणे हे त्याचं काम होतं. पण आता तो गडगंज श्रीमंत आहे.
Leave a Reply