
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटातील अभिनयाने अक्षयने फॅन्स आणि क्रिटिक्स दोघांचं मन जिंकलय. सोशल मीडियावर सतत त्याची चर्चा आहे. अक्षय खन्नाचा परफॉर्मन्स पाहून त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला सुद्धा रहावलं नाही. तिने सुद्धा कमेंट केलीय.
अभिनेत्री तारा शर्माने अक्षय खन्नाच कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली. दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. अलीकडेच ताराने इन्स्टाग्रामवर अक्षयसोबतचा एक जुना फोटो शेअर केलाय.
अक्षय तुला शुभेच्छा. आम्ही अजूनपर्यंत चित्रपट बघितलेला नाही. पण आमचं इन्स्टा फीड धुरंधरने भरलेलं आहे. खासकरुन ते गाणं आणि तुझी एन्ट्री. टीमला आणि तुला गुडलक. हा तेच गाणं, स्वॅग आणि औरा…लिंक स्टोरीमध्ये आहे. स्वाईप करं” असं तारा शर्माने लिहिलय.
आम्ही बालपणापासून एकमेकांना ओळखतो. आजही तू अभिनयाप्रती पूर्णपणे समर्पित आहेस हे पाहून चांगलं वाटतं. आपल्या शाळेच्या नाटकात कदाचित आपल्या सर्वांचा परफॉर्मन्सच्या विश्वात पहिलं पाऊल होतं. तेव्हापासून आम्हाला माहित होतं की, तू हेच करणारं
तू सर्वात जास्त प्रायवेट माणूस आहे. ज्याला मी ओळखते. तुझ्यासाठी मी खूप खुश आहे. तुझ्या मेहनतीला फळ मिळालं. एका फ्लॅशबॅक फोटो शेअर करतेय. तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला मी, माझी आई आणि रुपक सलूजा यांच्याकडून गुड लक




Leave a Reply