• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Akshaye Khanna : इकडे ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ, रेहमान डकैत हिट ! पण तिकडे अक्षय खन्ना मात्र..

December 17, 2025 by admin Leave a Comment


आदित्य धर याने दिग्दर्शित केलेल्या ‘धुरंधर’ ने (Dhurandhar) धूमाकूळ माजला असून माऊथ पब्लिसिटीवर चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट जोमाने पळत असून आत्तापर्यंत कमाईचे अनेक रेकॉर्ड्स हे ‘धुरंधर’ मोडले आहेत. रणवीर सिंग (Ranvweer Singh) , आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रणवीर सिंग जरी चित्रपटात नायकाच्या भूमिकेत असला तरी खलनायक बनलेला रेहमान डकैत अर्थात अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याच्यावर सध्या सगळा स्पॉटलाइट आहे. त्याचे डोळ, त्याची स्टाईल, स्वॅग, FA9LA या गाजत असलेल्या गाण्यावरच त्याचा डान्स याचेच सगळे दिवाने झाले असून त्याच्या कामाचं भरभरन कौतुक होत आहे.

फक्त सामान्य प्रेक्षक नव्हे तर सेलिब्रिटीही ‘धुरंधर’ चं आणि अक्षयच्या कामाची प्रचंड तारीफ करत आहेत. दिग्दर्शिका फराह खान, अभिनेत्री समंथा रुथ प्रभू, भाजप नेत्या स्मृती इराणी, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेकांनी अक्षय खन्नावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. मात्र पिक्चरला एवढंच यश मिळालेलं असताना आणि रेहमान डकैतच्या व्यक्तिरेखेचं एवढं कौतुक होत असताना, ही भूमिका करणारा अभक्षय खन्ना मात्र कुठेच दिसत नाहीये, लाइमलाइटपासून तो कोसो दूर आहे. अखेर आहे कुठे तो ?

अक्षय खन्ना सध्या काय करतो ?

रिपोर्ट्सनुसार, धुरंधरचा रेहमान डकैत म्हणजचे अक्षय खन्ना हा सगळ्या लाइमलाइटपासून दूर राहून त्याचं खासगी आयुष्य एन्जॉय करत आहेत. तो अलिबागच्या त्याच्या बंगल्यावर आहे. एवढंच नव्हे तर त्याने अलिबागच्या घरात, त्याच्या बंगल्यात एक पूजाही करून घेतली. त्याने वास्तू शांत पूजा करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गुरूजींनी केले फोटो शेअर

त्याच्या घरी ज्यांनी ही पूजा केली ते शिवम म्हात्रे गुरूजी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये अक्षय खन्ना हा भक्तिभावाने पूजा करताना दिसत आहे. पांढरा शर्ट, निळी जीन्स अशा वेशात असलेला अक्षय गुरूजींसोबत उभा राहून, ते जे सांगतील ते विधि करताना या व्हिडीओत दिसत आहे. यासह गुरूजींनी खास कॅप्शनही लिहीली आहे. “अभिनेता अक्षय खन्ना यांच्या घरी विधीवत आणि भक्तिभावाने पूजन करण्याचा सौभाग्ययोग लाभला. शांत स्वभाव, साधेपणा आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असे व्यक्तिमत्त्व अनुभवायला मिळाले” असं त्यांनी नमूद केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivam Guruji (@shivam_mhatre_guruji)

Akshaye Khanna : याला ऑस्कर द्या… ‘धुरंदर’मधला अक्षय खन्ना याचा ‘रेहमान डकैत’ सुपरहिट, प्रसिद्ध दिग्दर्शकही फिदा

पुढे त्यांनी अक्षय खन्ना याच्या अभिनयाचेही खूप कौतुक केलं. ” चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ‘क्लास’ म्हणजे अक्षय खन्ना. छावा या ऐतिहासिक चित्रपटातून सशक्त आणि प्रभावी भूमिका साकारत त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर धुरंधर सारख्या चित्रपटात दिसणारी त्यांची धारदार व्यक्तिरेखा, दृश्यम 2 मधील संयत पण अत्यंत ताकदवान अभिनय आणि Section 375 मधील गंभीर, वास्तवदर्शी भूमिका — प्रत्येक चित्रपटातून त्यांनी अभिनयाची वेगळी उंची गाठली आहे” असंही म्हात्रे गुरूजी यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. त्यांचे हे फोटो खूप व्हायरल झाले असून त्यावर हजारो लाईक्सही आले आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ambadas Danve : बाण-पंजा एक साथ…शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, ‘द मुरुड फाईल्स’ म्हणत दानवे यांचं शिंदे सेनेवर टीकास्त्र
  • Akshaye Khanna and Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हिच्यासाठी अक्षय खन्नाची बोल्ड कमेंट… तुम्ही पागल लोकांसारखं तिला फक्त…
  • Dhurandhar Aditya Dhar : 280 कोटींच्या ‘धुरंधर’ चा दिग्दर्शक आदित्य धर किती श्रीमंत ? नेटवर्थ ऐकून..
  • Ambernath Firing : निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार… भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार अन्…
  • Imtiaz Jaleel : कव्वालीच्या कार्यक्रमात MIM नेते इम्तियाज जलील यांच्यावर उधळल्या नोटा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in