
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय बड्या मंत्र्यांसह स्थानिक नेते मंडळींनी प्रचार सभा, रॅलीचा चांगलाच धडाका लावल्याचे पाहायला मिळत आहे. या स्थानिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
व्यासपीठावर महाराष्ट्राचे कोहिनूर म्हणून दादांना संबोधले असता, अजित पवारांनी मी हाडामासाचा माणूस आहे, कोहिनूर नाही असे म्हणत स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संबोधले. आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय वाटचालीचा संदर्भ देत, त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. तसेच, निवडणुकीच्या प्रचाराला रात्री १० वाजेपर्यंत मिळालेली परवानगी आणि त्यानंतरच्या मतदान प्रक्रियेवर त्यांनी मार्मिक भाष्य केले. फोटो आणि सेल्फीच्या वाढत्या मागणीमुळे होणारे त्रासही त्यांनी विनोदी शैलीत मांडले. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ न काढण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
Leave a Reply