
वकील असीम सरोदे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी राम खाडे यांना काळजी घेण्यास सांगितल्याचेही सरोदे यांनी म्हटले आहे. राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले आहेत.
वकील सरोदे यांच्याकडे राम खाडे विरुद्ध सुरेश धस यांचे एक प्रकरण होते. सुरेश धस यांनी आपल्या पदाचा वापर करून देवस्थानच्या अनेक जमिनी खाजगी मालमत्ता म्हणून हस्तांतरित केल्या आणि त्यांचे प्लॉट पाडून विकले, असा आरोप या प्रकरणात आहे. बीडमधील हे प्रकरण जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे राम खाडे यांच्यामार्फत मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती, असे वकील सरोदे यांनी नमूद केले.
Leave a Reply