
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी शिंदे गटाला टेस्ट ट्यूब बेबी म्हटले होते. यावरभाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नसली तरी, त्यांना एक प्रश्न विचारला की, तुम्ही शिवतीर्थावर जाऊन झिम्मा खेळून आलात, अनिल परब यांना घेऊन फुगडी घालून आलात, तरी शिवतीर्थावरचा चाफा ना डोलेना, ना बोलेना. शिवतीर्थावर वारंवार जाण्यामागे मनधरणी किंवा पायधरणी चालू आहे का, याचा खरा अर्थ त्यांनी स्पष्ट करावा, असे आवाहन शेलार यांनी केले. तसेच, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला उद्देशून शेलार म्हणाले की, जेव्हा युतीत होता, तेव्हा मातोश्रीवर येऊन चर्चा केली जात असे. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील पराभव समोर दिसल्यावर उद्धव ठाकरेंची अकड कुठे गेली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Leave a Reply