
Rekha Dance Viral Video: बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. रेखा यांना पाहिल्यानंतर असं कोणीच म्हणणार नाही की, त्या 71 वर्षांच्या आहे… वय म्हणजे फक्त एक आकडा आहे… असं म्हणतात ते रेखा यांच्याबाबतीत खरं आहे… आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेखा डान्स करताना दिसत आहेत. चाहत्यांना देखील रेखा यांचा खास अंदाज प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. रेखा यांनी वयाच्या 71 व्या वर्षी 65 वर्ष जुन्या गाण्यावर डान्स केला आहे.
डान्स स्टेप आणि अदांवर चाहते फिदा…
वयाच्या 71 व्या वर्षी देखील रेखा यांच्या डान्स स्टेप आणि चेहऱ्यावरीन हावभाव जबरदस्त आहेत… व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, बॉलिवूडमध्ये रेखा यांची जगा कोणीच घेऊ शकत नाही… रेखा यांनी ‘मोहे पनघट पे’ गाण्यावर डान्स केला… भरजरी लेहेंगा, रॉयल ज्वेलरी आणि दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले आहेत… रेखा यांच्या दमदार डान्सने चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे… असं म्हणायला देखील हरकत नाही…
View this post on Instagram
‘मोहे पनघट पे’ गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुगल – ए – आजम’ सिनेमातील हे गाणं आजही अनेकांच्या पसंतीस उतरतं… या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हे गाणं जुनं असली तर चाहत्यांसाठी नवीन आहे…
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव…
रेखा यांच्या नृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक त्यांच्या नृत्याचे आणि शैलीचे सतत कौतुक करत आहेत. रेखा यांच्या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे… एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं, ‘वाह रेखा किती दिलखेच अंदाज आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘या वयात देखील इतका सुंदर डान्स…’
‘रेड सी ऑनर अवार्ड’ने अभिनेत्रीचा सन्मान
रेखा यांनी जेद्दाह येथील रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही हजेरी लावली, जिथे त्यांना रेड सी ऑनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यादरम्यान त्यांनी एक शायरी देखील प्रेक्षकांना ऐकवली. आईबद्दलची एक हृदयस्पर्शी कहाणी सांगितली. अभिनेत्री म्हणाली, “सिनेमांमुळे मी जिवंत आहे.”
Leave a Reply