
तुम्ही जर नवीन मिड-रेंज फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नुकताच लाँच झालेला मोटोरोला एज 70 हा फोन 23 डिसेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये एआय फीचर्स, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 5000एमएएच ची पॉवरफुल बॅटरी समाविष्ट आहे. फोनला कंपनीकडून तीन अँड्रॉइड अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतील. या हँडसेटवर तुम्हाला किती खर्च करावा लागेल आणि त्यात कोणते खास फीचर्स आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
मोटोरोला एज 70 ची भारतातील किंमत
या मोटोरोला स्मार्टफोनची किंमत 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या सिंगल व्हेरिएंट 29, 999 रूपये आहे. कंपनी या फोनसोबत एक परिचयात्मक ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फोन खरेदी करताना बँक कार्ड डिस्काउंटद्वारे 1000 रूपये वाचवू शकता. तुम्हाला एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डसह 1000 रूपये आणि एचडीएफसी आणि आयडीएफसी बँक क्रेडिट कार्डसह 1500 रूपयांची त्वरित सूट मिळेल.
मोटोरोला एज 70 पर्याय
25 ते 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये मोटोरोला कंपनीचा हा फोन Nothing Phone (3a), realme 14 Pro + 5G, vivo T4 Pro 5G आणि OPPO Reno13 5G सारख्या मॉडेल्सना कडक टक्कर देईल.
मोटोरोला एज 70 स्पेसिफिकेशन्स
ऑपरेटिंग सिस्टम: मोटोरोला कंपनीचा हा फोन अँड्रॉइड 16 आणि आधारित हॅलो यूआय स्किनवर काम करतो.
डिस्प्ले: या हँडसेटमध्ये 6.7-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ आणि स्क्रीन प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास 7i सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या नवीनतम मोटोरोला फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरल 4 प्रोसेसर देण्यात आला आहे.
एआय फीचर्स: हा मिड-रेंज फोन कॅच मी अप 2.0, नेक्स्ट मूव्ह, रिमेम्बर दिस + रिकॉल, पे अटेंशन 2.0, एआय व्हिडिओ एन्हांसमेंट, एआय फोटो एन्हांसमेंट आणि एआय अॅक्शन शॉट सारख्या अनेक एआय टूल्सना देखील सपोर्ट करतो.
कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि थ्री-इन-वन लाईट सेन्सर आहे. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: या फोनमध्ये 68 वॅट वायर्ड आणि 15 वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएचची पॉवरफूल बॅटरी आहे.
Leave a Reply