• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

40 मिनिटं वाट पाहूनही पुतिन पाकिस्तानच्या पंतप्रधानांना का भेटले नाहीत? पहिल्यांदाच समोर आलं खळबळजनक कारण

December 13, 2025 by admin Leave a Comment


पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या चांगलेच चर्चेमध्ये आहेत, शहबाज शरीफ हे तुर्कमेनिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. या परिषदेमध्ये जगभरातील अनेक देशांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. या परिषदेला रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन देखील उपस्थित होती. सध्या रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शहबाज शरीफ यांना पुतिन यांची भेट घ्यायची होती, शरीफ पुतिन यांना भेटण्यासाठी बैठकीच्या नियोजित स्थळी पोहोचले, मात्र तब्बल 40 मिनिटं पुतिन यांची वाट पाहून देखील पुतिन यांनी शरीफ यांची भेट न घेतल्यानं त्यांची चांगलीच निराशा झाली, त्यांचा मोठा अपमान झाला. सध्या या घटनेची जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आता पुतिन यांनी शरीफ यांची भेट का नाकाराली? याच कारण पहिल्यांदाच समोर आलं आहे.

भेट का नाकारली?

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ त्या हॉलमध्ये आधीच जाऊन बसले होते, ज्या हॉलमध्ये पुतिन आणि शरीफ यांची बैठक होणार होती. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील समोर आला होता, ज्यामध्ये एका बाजूला पाकिस्तानचा आणि दुसर्‍या बाजूला रशियाचा झेंडा दिसत होता. शरीफ जवळपास 40 मिनिटं त्या हॉलमध्येच बसून होते, मात्र पुतिन यांनी त्यांची भेट घेतलीच नाही, अखेर चाळीस मिनिटांनंतर शरीफ हे त्या हॉलमधून बाहेर पडले. यामुळे सध्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची जगभरात चर्चा सुरू आहे.

शरिफ यांना पुतिन यांची 40 मिनिटं वाट का पहावी लागली? आणि वाट पाहून देखील पुतिन यांनी शरीफ यांची भेट का घेतली नाही? याबाबत आता रशियाच्या एका वृत्तपत्राकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन आणि तुर्कीचे अध्यक्ष एर्दोआन यांची बैठक एवढी दीर्घ चालली की, पुतिन यांना त्यामुळे शरीफ यांच्या बैठकीला येता आलं नाही, त्यानंतर शरीफ हे पुतिन यांची तब्बल 40 मिनिट वाट पाहून त्यांना न भेटताच चालले गेले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shilpa Shetty and Raj Kundra: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ, … म्हणून अधिक कसून होणार चौकशी
  • Heavy Rain Alert : 17 ते 20 डिसेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, थेट अलर्ट जारी, राज्यात..
  • अंबरनाथमध्ये भाजप कार्यालयावर गोळीबार, सीसीटिव्ही फुटेज समोर
  • 50 डिग्री तापमान, जळजळणारी वाळू… ‘रामायण’च्या केवट दृश्यात काय झालं? जाणून घ्या
  • Maharashtra News Live : राज्यात महापालिकेच्या निवडणुकीचे वारे, सर्वच राजकीय पक्षांकडून..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in