
26/11 Mumbai terror attacks : 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याने तुरुंगात असताना मटण बिर्याणी मागितली होती… अशा अनेक अफवा पसरल्या होत्या. ही अफवा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खटल्यादरम्यान पसरवली होती… ज्यामुळे मुंबईवर हल्ला करण्याऱ्या कसाब याने बिर्याणी मागितली.. या अफवांनी जोर धरला. पण तेव्हा कोर्टात आणि कोर्टाबाहेर नक्की काय घडलं हे खुद्द उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. एका मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी घडलेली घटना सांगितली.
कसाब याला खरंच बिर्याणी खायला दिलेली की ते पसरवलं होतं… असा प्रश्न उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आला. यावर वकील म्हणाले, मला विचारल्यानंतर सांगितलं, आज कसाब याने मटण बिर्याणीची मागणी केली… सर्वांना प्रश्न पडला खरंच त्याने बिर्याणीची मागणी केली… लगेच ब्रेकिंग न्यूज… कसाब याने मटण बिर्याणीची मागणी केली…’ पण तेव्हा नक्की काय झालेलं याबद्दल देखील उज्ज्वल निकम यांनी सविस्तर सांगितलं.
पुढे निकम म्हणाले, तुम्हाला असं वाटतं फक्तम माध्यम असं करु शकतात… आम्ही देखील असं एकदा केलं… मी जळगाव शनिवार राविवार जायचो… सोमवारी जेव्हा मी आलो तेव्हा राक्षाबंधन सण होता. माझ्या हातात राखी बांधलेली होती. तेव्हा कसाब याने मला विचारलं, बादशाह ये क्या है? मी त्याला सांगितलं, बहीण राखी बांधते, बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी भावाची असते.
‘त्यानंतर कोर्टातून बाहेर आल्यानंतर माध्यामांनी मला विचारलं आणि त्यांना मी सांगितलं आज कसाब याने मटण बिर्याणी मागितली आहे… त्यामुळे लगेच ब्रेकिंग न्यूज आली. कसाबने मटण बिर्याणी मागितली… दुसऱ्या दिवशी वकिलाने प्रश्न उपस्थित केला, निकम असं का बोलत आहेत? यावर कोर्टाने मला मला विचारलं.
निकम म्हणाले, कसाब पाकिस्तानातून आहे. तो कायम मटण खात असेल… त्याने बिर्यानी मागितली की नाही तुम्ही त्यालाच विचारा… कसाब याला देखील काही कळलं नाही… तेव्हा कसाबने देखील मान खाली घातली… त्यामुळे फक्त मला आणि कसाबलाच माहिती आहे की, त्याने बिर्यानी माहितली होती की नव्हती… आणि आपल्या संस्कृतीनुसार जाणाऱ्या व्यक्तीला कधीच वाईट म्हटलं जात नाही… असं देखील वकील उज्ज्वल निकम म्हणाले.
Leave a Reply