• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

25 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची बॉयफ्रेंडने केली हत्या! चाकूने अनेक वार करून घेतला जीव

December 25, 2025 by admin Leave a Comment


काही दिवसांपूर्वी हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली होती. प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक रॉब रेनर आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा आरोप मुलावर लागला होता. आता त्याचप्रमाणे आणखी एका घटनेने हॉलिवूड हादरले आहे. आता २५ वर्षीय अभिनेत्री इमानी डिया स्मिथची हत्या झाली आहे आणि आरोप तिच्या बॉयफ्रेंडवर करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी निवेदन देताना सांगितले की, इमानीच्या बॉयफ्रेंड जॉर्डन डी जॅक्सन स्मॉलला अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.

25 डिसेंबरला जेव्हा जगभरात ख्रिसमस उत्साहाने साजरा केला जात आहे, तेव्हा दुसरीकडे हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. ‘द लायन किंग’मधील नाला म्हणजे इमानीची हत्या झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिने वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. सांगायचे तर, अभिनेत्रीची हत्या काही दिवसांपूर्वीच झाली होती, पण त्यांच्या हत्येची दु:खद बातमी आता समोर आली आहे. अभिनेत्री न्यू जर्सीतील घरात मृत अवस्थेत आढळली होती.

२१ डिसेंबरला घरात सापडला होता मृतदेह

इमानीचा मृतदेह २१ डिसेंबरला अमेरिकेतील न्यू जर्सीच्या एडिसन येथील एका घरात सापडला होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले होते. मिडलसेक्स काउंटी अभियोक्ता कार्यालयानुसार तिच्या अंगावर चाकूचे अनेक घाव होते. अभिनेत्रीला न्यू ब्रंसविक येथील रॉबर्ट वुड जॉनसन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेले होते, पण रुग्णालयाने तिला मृत घोषित केले.

३ वर्षांच्या मुलाची आई होती इमानी

क्राउड फंडिंग वेबसाइट GoFundMe नुसार इमानीच्या कुटुंबीयांनी तिच्या बॉयफ्रेंड जॉर्डनवर हत्येचा आरोप लावताना सांगितले की, कोणत्याही कारणाशिवाय इमानीची हत्या करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की ही घटना अचानक घडलेली नाही. या प्रकरणात प्रथम श्रेणी हत्या, द्वितीय श्रेणीत मुलाच्या कल्याणाला धोका पोहोचवण्याचे आरोपही जॉर्डनवर लावण्यात आले आहेत. सांगितले जात आहे की, दिवंगत अभिनेत्री तीन वर्षांच्या मुलाची आई होती आणि हे मूल जॉर्डनचेच आहे. पण, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतातील असं एक गाव जिथे बायको आपल्या पतीला काठीने बदड बदड बडवते, कारण ऐकून बसेल धक्का
  • मोठी बातमी! महायुतीत उभी फुट? मागण्या मान्य झाल्या तरच….भाजपाच्या टोकाच्या भूमिकेमुळे अघटित घडणार?
  • VHT 2025 : विराट-रोहितचा सामना लाईव्ह टेलिकास्ट का केला नाही? आर अश्विनने सांगितलं कारण…
  • इंडिगो गोंधळानंतर 2 नव्या विमानकंपन्यांना सरकारची मंजूरी, त्यांचे मालक आणि इतिहास काय ?
  • ऑफिसच्या डेस्कवर ‘या’ वस्तू कधीच ठेऊ नका, प्रगतीत येतील अडथळे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in