• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

24, 25 आणि 26 डिसेंबरला मुसळधार पाऊस, थेट अतिवृष्टीचा इशारा, राज्यासह..

December 24, 2025 by admin Leave a Comment


राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसतोय. हवा प्रचंड प्रदूषित असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला असून हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. कोर्टाने देखील फटकारे आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून राज्यात शीत लहरी येत आहेत. संपूर्ण डिसेंबर महिना थंडी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक एक अंकी किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यात यंदा हुडहुडी वाढली असून डिसेंबर महिन्याने थंडीचे गेल्या दहा वर्षातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. डिसेंबरच्या अवघ्या 23 दिवसात तब्बल तेरा दिवस किमान तापमानाची नोंद एक अंकी झाली आहे .

गेल्या दहा वर्षातील हा एक विक्रम ठरला आहे 2014 पासून ची आकडेवारी पाहता यंदाचा डिसेंबर सर्वाधिक थंड असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. थंडीसोबतच गारठा प्रचंड आहे. सकाळच्या वेळी मुंबईतही थंडी जाणवत आहे. राज्यातील काही भागात पारा 6 अंशावर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात जरी थंडीचा कडाका असला तरीही देशातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला.

धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 5.8 तापमान होते. परभणीत 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, जळगाव, नागपूर आणि भंडारा येथे 10 अंश तापमानाी नोंद झाली. पुढील काही दिवसही राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबईसह पुण्यात वायू प्रदूषण प्रचंड वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हवा घातक आहे.

भारतीय हवामान विभागाने 24, 25, 26 आणि 27 डिसेंबर रोजी देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. जम्मू-कश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड, लडाख, अंदमान, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशातून मॉन्सून जाऊन काही महिने झाले आहेत. मात्र, तरीही अनेक भागात पाऊस सुरू आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हनुमान चालीसा जवळ ठेवूनच पहा ही हॉरर सीरिज; आयएमडीबीवर जबरदस्त रेटिंग
  • मोठी बातमी! बंगालच्या खाडीत मोठा धमाका, अनेक किलोमीटरपर्यंत हादरा, चीनसह पाकड्यांनी..
  • हिवाळ्यात कुरळ्या केसांची योग्य काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या
  • जसप्रीत बुमराहने केलेल्या त्या शब्दावर टेम्बा बावुमा अखेर व्यक्त झाला, म्हणाला…
  • जगाला हादरवणारा अमेरिकेचा निर्णय, थेट थांबवली ही प्रक्रिया, अधिक पगार आणि..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in