
Narendra Modi Ethiopia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इथिोपिया या देशाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान म्हणून ते पहिल्यांदाच या देशात गेले आहेत. गेल्या 11 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी हे भारताचे आफ्रिकासोबतचे संबंध वाढावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांना यश येत असून 11 वर्षांत भारत-आफ्रिका यांच्यातील संबंध एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत. गेल्या एका वर्षात नरेंद्र मोद आपल्या दौऱ्यांच्या माध्यमातून आफ्रिकेसोबत भारताची जवळीक वाढवत आहेत. या यात्रांच्या माध्यमातून पूर्ण आफ्रिकेत राजनयिक आणि विकासविषयक संबंधांना पुनरुज्जीवित करण्यात आले आहे.
इथिओपियाला जाण्याआधी मोदी याच वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. जुलै 2025 मध्ये त्यांनी घाना या देशाचा दौरा केला होता. घाणा जाण्याआधी तेक नामीबिया या देशातही जाऊन आले होते. मार्च 2025 मध्ये त्यांनी मॉरिशसला भेट दिली होती. तर नोव्हेंबर 2024 मध्ये मोदी यांनी नायजेरिया या देशाला भेट दिली होती.
इथिओपियात मोदी नेमकं काय म्हणाले?
इथिओपियाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि इथिओपिया यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. हजारो वर्षांपासून हे दोन्ही देश संपर्कात आहेत. या दोन्ही देशांत देवाणघेवाण होत आलेली आहे. हे दोन्ही देश भाषा, परंपरा यांनी समृद्ध असून ग्लोबल साऊथचे चे सहयात्री आहेत. इथिओपियामधील अदीस अबाबा येथील नॅशनल पॅलेसमध्ये मोदी आणि इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्यात प्रतिनिधी मंडळ स्तरावरील चर्चा झाली.
जी-20 बैठकीत दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींची भेट
याआधी नोव्हेंबर महिन्यात नरेंद्र मोदी जोहान्सबर्गमध्ये जी-20 च्या बैठकीत गेले होते. यावेळीदेखील मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांच्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत द्विपक्षीय सहकार्यावर विशेषत: संस्कृती, तंत्रज्ञान, स्किलिंग, एआय, महत्त्वपूर्ण खनिजे, व्यापरात वाढ करण्याबाबत चर्चा झाली होती.
आफ्रिकन देशांशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न
दरम्यान, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्यात घाना या देशाचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी घाना या देशाच्या संस्कृतीचा, तेथील वारशाचा उल्लेख केला होता. गेल्या काही कालावधित मोदी यांनी आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर जाऊन त्या देशांचे भारतासोबतचे संबंध कसे वाढतील यासाठी प्रयत्न केलेले आहेत. विकासासाठी सहकार्य अधिक दृढ व्हावे, हाच यामागे उद्देश आहे.
Leave a Reply