
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी राजकारणात चांगल्याच सक्रिय असून अनेकदा संसदेत प्रियांका गांधी आवाज उठवताना दिसतात. याशिवाय अनेक मुद्द्यांमध्ये त्यांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली. प्रियांका गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हातात घेतली असून भाऊ राहुल गांधींना खंबीरपणे साथ दिली. प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्याने नक्कीच काँग्रेसला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आली. रॉबर्ट वाड्रा यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप असून हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. आता प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी मोठे शुभकार्य पार पडणार आहे. प्रियांका गांधी सासूबाई होणार असून प्रियांका आणि रॉबर्ट यांच्या घरी सुनबाई येणार असून लवकरच प्रियांका गांधी यांच्या मुलाचा साखरपुडा पार पडणार आहे.
प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा लवकरच साखरपुडा करणार असून तयारीही सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, रेहान वाड्रा दिल्लीतील मुलीला सात वर्षापासून डेट करत होता. रेहान वाड्रा याच्या प्रेयसीचे नाव अविवा बेगला असून सात वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अगोदर साखरपुडा होईल आणि त्यानंतर खास लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न पार पडेल.
दोन्ही कुटुंबियांनी या नात्याला होकार दिला असून साखरपुड्याची तयारी सुरू आहे. अविवा बेग आणि तिचे कुटुंब दिल्लीचे रहिवासी आहेत. रेहान आणि अविवा बेग अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते दोघे अगोदर एकमेकांचे मित्र होते, त्यानंतर ते प्रेमात पडले. नवीन वर्षाच्या सुरूवातीला दोघांचा साखरपुडा पार पडेल, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
हा साखरपुडा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत होईल. मात्र, नेमका कुठे याबाबत अजून माहिती पुढे आली नाही. रेहान वाड्रा हा मामा राहुल गांधी यांचा लाडका असून राहुल गांधीला रेहान वाड्रा याच्यासोबत वेळ घालवण्यास आवडतो. बऱ्याचदा प्रियांका गांधी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.
Leave a Reply