• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात करा समावेश

November 28, 2025 by admin Leave a Comment


हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत बहुतेकजण त्यांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात करतात कारण या थंड वातावरणात शरीराला आतून उबदारपणा प्रदान करतात, ज्यामुळे शरीरावर थंडीचा प्रभाव कमी होतो आणि निरोगी राहण्यास मदत होते. तर आपल्याकडे फळे आणि भाज्या देखील ऋतूनुसार येऊ लागतात, बहुतेक लोकं आहारात हंगामी फळांचा समावेश करण्याचा सल्ला देतात कारण त्यात ऋतूनुसार पोषक घटक जे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात. बहुतेक लोकांना वाटते की फळांचा स्वभाव थंड असतो, परंतु काही फळे अशी असतात जी उष्ण स्वभावाची असतात आणि हिवाळ्यात ती खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

हिवाळ्यात आपल्याला केवळ आपले शरीर उबदार ठेवण्याची गरज नाही, तर भरपूर पोषक तत्वांची देखील आवश्यकता असते. आपण विशेषतः व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि फायबर सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ व फळे यांचे सेवन करावे. कारण फळे आपल्या शरीरातील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की हिवाळ्यात कोणत्या फळांचे सेवन करावे?

अंजीर फळाचे करा सेवन

हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात अंजीर फळांचा समावेश करू शकता. तुम्ही अंजीर फळ किंवा सुके अंजीर दोन्ही प्रकारात खाणे फायदेशीर आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते अंजीर खाल्ल्याने तुम्हाला प्रथिने, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त, तांबे, मॅंगनीज, लोह, व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे यासह अनेक पोषक तत्वे मिळतात.

खजूर देखील आहेत फायदेशीर

हिवाळ्यात तुमच्या आहारात खजूरांचा समावेश नक्की करा. कारण खजूराच्या सेवनाने उबदारपणा वाढतो आणि भरपूर पोषक तत्वे मिळतात. तुम्ही खजूर दुधात मिक्स करून खाऊ शकता किंवा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. खजूर आणि बदामाचे लाडू देखील स्वादिष्ट असतात.

चिकू फळ

चिकू हे एक असे फळ आहे जे तुम्हाला वर्षातील बहुतेक वेळेस बाजारात सहज मिळू शकते. चिकू फळांमध्ये उबदारपणाचा प्रभाव असतो. दाणेदार पोत असलेले हे गोड फळ जिभेवर विरघळते. हेल्थलाइनच्या मते, ते व्हिटॅमिन सीचे स्रोत आहे आणि त्यात चांगल्या प्रमाणात फायबर असते. चिकूमध्ये पोटॅशियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक देखील असतात.

पपईचाही आहारात करा समावेश

पपई हा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे. त्यात प्रथिने, फोलेट, पोटॅशियम आणि फायबर देखील चांगल्या प्रमाणात असतात. पपई हिवाळ्यात पचन सुधारण्यास आणि निरोगी त्वचा राखण्यास मदत करू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेयत…संजय राऊतांचा गर्भित इशारा कुणाला? महाविकास आघाडीला ‘मनसे’ भगदाड पडणार?
  • नागार्जुनच्या दुसऱ्या पत्नीमुळे मोडला असता रजनीकांत यांचा संसार, अमालाच्या प्रेमात थलायवाने उचलेलं मोठं पाऊल
  • Anmol Bishnoi : गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून पकडून भारतात आणलं, पण…केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याच्याबाबतीत घेतला एक मोठा निर्णय
  • कोणत्या लोकांची उंची अचानक कमी होते? ‘ही’ समस्या उद्भवू शकते? जाणून घ्या
  • IND vs SA : संजू सॅमसन सोडा, शुबमन गिलमुळे मराठी मुलावर अन्याय, गौतम गंभीर इकडे लक्ष द्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in