
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, पीठ तयार झाल्यानंतर, तयार झालेलं पीठ गॅसजवळ, फ्रीजच्या वर, किंवा स्वयंपाकघरात उबदार ठिकाणी ठेवा. ओव्हन असेल तर फक्त लाईट ऑन करून आत ठेवा. पण ओव्हन गरम करु नका.
कोमट पाणी वापरा. पीठ भिजवताना किंवा दळताना थोडंसं कोमट पाणी वापरल्याने आंबायला मदत होते. त्यानंतर मीठ नंतर घाला. दळल्यानंतर पीठ थोडं आंबू द्या, मग मीठ घाला. मीठ लवकर घातल्यास आंबणं मंद होतं.
थोडे पोहे किंवा शिजवलेला भात घाला. दळताना 2–3 चमचे जाड पोहे किंवा थोडासा शिजवलेला भात घातला तर आंबणं चांगलं होतं. पीठ जास्त बारीक करु नका. पीठ थोडं घट्टच ठेवा… फार पातळ पीठ लवकर आंबत नाही.
जुने आंबलेले पीठ असल्यास ते सुद्धा तुम्ही वापरु शकता. 1–2 चमचे जुने आंबलेले इडली पीठ नवीन पिठात मिसळा. सतत पातेल्याचं झाकण उघडून पाहून नका. पीठ अंबाण्यासाठी हिवाळ्यात 12–18 तास लागू शकतात, जास्त घाई करू नका.
जर तरीही आंबलं नाही तर 1 टीस्पून साखर मिसळून 2–3 तास उबदार ठिकाणी ठेवा किंवा 1–2 चमचे जुनं आंबलेलं पीठ घाला… असं केल्यास इडलीचं पीठ लवकर आंबेल आणि इडल्या मऊ होतील..




Leave a Reply