
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी बैठका मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. काही ठिकाणी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरवात झाली आहे. त्यामुळे नेत्यांनी एकमेकांवर टीकाही करायला सुरुवात केली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, त्यानंतर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. आज भाजपचे हिंदूत्ववादी नेते आणि मस्त्सविकास मंत्री नितेश राणे हे मिरा भाईंदर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हिरव्या सापांना…
राज्याचे मत्सविकास मंत्री नितेश राणे यांनी मिरा भाईंदरमध्ये बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘मिरा भाईंदरच्या आजूबाजूच्या परिसरात बघा किती हिरवे साप वळवळ करत आहेत. हिरव्या सापांना इथे दूध पाजू नका हे तुमचे कधीच होणार नाहीत. ते तुम्हाला त्यांच्या खिशातले काढून देणार नाहीत. गोलटोपी आणि हिरवे साप इकडून मोठ्या प्रमाणात मच्छी मारून घेऊन जातात त्यामुळे ड्रोन चालू केले आहेत.’
26 योजना चालू करणार…
पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, ‘तुम्ही मला एकदा मला पाच वर्षे द्या, मी संपूर्ण भागाचा विकास करून देईन. 2026 ला आम्ही मुख्यमंत्री मत्स्य विकास योजना सुरु करणार आहोत. त्याच बरोबर आम्ही 2026 ला आम्ही 26 योजना चालू करणार आहेत. तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडवतो, मात्र मतदान त्यांना करता असे होता कामा नये. आम्ही पाहिल्यांदा 100 दिवसात मच्छीमारीला शेतीचा दर्जा दिला. जी शेतकऱ्यांना भरपाई मिळते त्याच प्रकारची भरपाई तुम्हाला देखील मिळणार आहे’ असं राणे यांनी म्हटले आहे.
नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, ‘आमचं सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. संपूर्ण समाजाची काळजी घेणारे सरकार आहे. आम्ही सर्वांना घेऊन चालणारे लोक आहोत. पण जर आमच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात जर कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर तो शुक्रवारी दोन पायांवर जाणार नाही याची काळजी घेणारेही आम्ही आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुमचा विकास करू.’
Leave a Reply