
अभिनेता रवी दुबेची गणना अशा अभिनेत्यांमध्ये होते, ज्याने टीव्हीपासून ओटीटीपर्यंत आपल्या कामगिरीचं नातं खणखणीत वाजवलं आहे. रवीने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यानंतर त्याने अनेक टीव्ही शोजचं सूत्रसंचालन देखील केलं. आता रवी दुबे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटात तो लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. रवीने 2006 मध्ये ‘स्त्री तेरी कहानी’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्याने ‘डोली सजा के’ आणि ‘यहां के हम सिकंदर’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या. रवीला ‘सास बिना ससुराल’ आणि ‘जमाई राजा’ यांसारख्या मालिकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय ‘नच बलिये 5’ आणि ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 8’ यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्येही त्याने भाग घेतला. आता रामायणातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा रवी दुबे खऱ्या आयुष्यात कोणत्या धर्माला फॉलो करतो याबद्दल जाणून घेऊयात…
रवी दुबेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असे अनेक फोटो पाहायला मिळतात, ज्यामध्ये तो कधी मंदिरात पूजा करताना, तर कधी गंगा माँची आरती करताना आणि कधी गुरुद्वारामध्ये डोकं टेकवताना दिसून येतो. रवीने एका मुलाखतीत त्याच्या धार्मिक मान्यतांविषयी मोकळेपणे आपलं मत मांडलं होतं. याशिवाय या मुलाखतीत रवी त्याच्या कॉलेजच्या दिवसांबद्दलही व्यक्त झाला. इंजीनियरिंगचं शिक्षण घेताना रवी नापास झाला होता. नापास झाल्यानंतर तो इतका निराश झाला की त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. अशातच त्याच्या आयुष्यात असं काही घडलं की त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
View this post on Instagram
याविषयी रवी म्हणाला, “ध्यान साधना करणं आणि बौद्ध धर्माचं पालन हे आता माझ्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत. या गोष्टींनी खऱ्या अर्थाने आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे आयुष्यातील अत्यंत कठीण काळात असताना मी बौद्ध धर्माचा पालन करणं सुरू केलं होतं. तेव्हापासूनच मी मंत्रजाप करायचो.” रवी दुबे हा निचिरेन बौद्ध धर्माचं पालन करतो. ही महायान बौद्ध धर्माची एक शाखा आहे, जी 13 व्या शतकातील जपानी बौद्ध भिक्षु निचिरेन यांच्या शिकवणीवर आधारित आहे. हे कामाकुरा काळातल्या शाळांपैकी एक आहे. या धर्माची शिकवण निचिरेनद्वारा लिहिल्या गेलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित जवळपास 300 ते 400 उपलब्ध पत्र आणि ग्रंथांद्वारे घेतली आहे. रवी दुबे बौद्ध धर्माचा अनुयायी बनला आहे.
Leave a Reply