• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हळद जास्त पोटात गेली तर किडनी आणि लिव्हर फेल ? सुरक्षित प्रमाण काय ?

December 2, 2025 by admin Leave a Comment


भारतीय आहार आणि आयुर्वेदिक उपचारात एक महत्वाचा मसाला आणि औषध म्हणून वापरली जात असलेली हळद प्रसिद्ध आहे. आयुर्वेदात हळद ही सर्वाधिक फायद्याची म्हटली जाते. यातील एक कंपाऊंड असते करक्युमिन जे हळदीचा सर्वात मोठी ताकद असते. या सूजविरोधी आणि एंटीऑक्सीडेंट गुणांसाठीही ओळखले जाते. यामुळे कोणतीही जखम झाल्यानंतर हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.परंतू हळदीचे अधिक प्रमाणात सेवन केले तर लिव्हर आणि किडनीच्या आरोग्यासाठी ते नुकसान कारक असते. जर तुम्ही हळदीचे सेवन करत असाल तर आधी याचे नुकसान आणि प्रमाण जाणून घ्या.

किडनीवर वाईट परिणाम केव्हा ?

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिसिनच्या रिसर्चनुसार हळदीतील ऑक्सलेट जास्त असल्याने ते लघवीतील ऑक्सलेट वाढवते. त्यामुळे कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोनची जोखीम वाढते. ही समस्या त्या लोकात आणखी गंभीर होऊ शकते ज्यांना आधीच स्टोनचा प्रॉब्लेम झालेला आहे.

अन्य एका बातमीननुसार प्रदीर्घ काळ दुसरी औषधे वा आजारांसोबत हळद वा कर्क्युमिन सप्लीमेंटचा हेव्ही डोस घेतल्याने काही लोकांमध्ये ऑक्सलेट नेफ्रोपॅथी ( किडनीला नुकसान ) सारख्या केस समोर येतात.

लिव्हरवर वाईट परिणाम केव्हा ?

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार सामान्य डाएटमध्ये हळद सर्वसामान्यपणे सुरक्षित आणि अनेक वेळा लिव्हरच्या सूजेवर फायदेमंद मानले जाते. परंतू गेल्या काही वर्षांत लोकांनी हळद किंवा कर्क्युमिन सप्लीमेंटचे अधिक प्रमाण घेण्यास सुरु केले आहे. बातमीनुसार अशा लोकात 1 ते 4 महिन्यात इंटेन्स ड्रग – इंड्यूस्ड लिव्हर इंज्युरी, लिव्हर फेल आणि कधी-कधी हेपाटो-रेनल सिंड्रोम देखील पाहिला गेला आहे. समस्या तेव्हा वाढते जेव्हा हळदीत पिपरिन ( काळ्या मिरीचा अर्क ) मिसळलेला असेल तर तो शोषण अधिक वाढवतो.

हळदीचे सुरक्षित प्रमाण आणि सुरक्षितता

WHO 0–3 mg प्रति किलो शरीराच्या वजनाच्या प्रमाणाने प्रतिदिवस कर्क्युमिनचे प्रमाण मर्यादित करण्याचा सल्ला दिला जातो. जर एखाद्या व्यक्तीचे वजन 60 ते 70 किलो असेल तर त्याने 200 mg प्रतिदिन हून अधिक कर्क्युमिन घेऊ नये. जर भारतीयांच्या डाएटच्या विचार केला तर सामान्य भारतीयांच्या डाएटमध्ये 2–2.5 g हळदीतून केवळ 60–100 mg कर्क्यूमिन मिळते.

जेवण बनवताना रोज अर्धा चमचा वा एक चमचा हळद ( सुमारे 2–3 g) सर्वसाधारणपणे सुरक्षित आहे. जर किडनी – लिव्हरचा काही गंभीर त्रास असायला नको.

ज्यांना लोकांना आधीपासूनच किडनीचा आजार, किडनी स्टोन, लिव्हर डिसिज ( फॅटी लिव्हर, हेपेटायटीस आदी ) गॉलब्लॅडर स्टोन असेल वा ते रक्त पातळ करणारी, इम्यूनसप्रेसेंट, टॅक्रोलिमस आदी औषधे घेत असतील तर त्यांनी डॉक्टराच्या सल्ला शिवाय निश्चित प्रमाणापेक्षा जास्त हळद घेऊ नये.

जर हळद/कर्क्युमिन सप्लीमेंट घेतल्यानंतर काविळ, डार्क लघवी, तीव्र थकवा, पोटात उजव्या बाजूला वरती दुखत असेल, वा अचानक किडनीच्या तक्रार अशी लक्षणे दिसत असतील तर त्यांनी डॉक्टरांना लागलीच भेटावे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Epstein Files: शेकडो तरुणींचे फोटो,अश्लील मॅसेज, मुलींचे रेटकार्ड, एपस्टीन फाईलचा अमेरिकेच्या राजकारणात भूकंप! डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरे
  • IND vs SA : संजू सॅमसनने 22 चेंडूत जे करुन दाखवलं, ते शुबमन गिलला पूर्ण सीरीजमध्ये नाही जमलं
  • सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा, आई पूनमने थेट म्हटले, दोन वर्ष..
  • Horoscope Today 20 December 2025 : जोडीदाराला दिलेली आश्वासनं विसराल, या राशींचं आज जोरदार वाजणार, वीकेंड तर..
  • Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना हाय कोर्टाचा मोठा दिलासा, जामीन मंजूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in