• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्टारलिंक रशियाच्या टार्गेटवर ? इलॉन मस्क चिंतेत, अमेरिकेत खळबळ

December 23, 2025 by admin Leave a Comment


नाटोच्या दोन सदस्य देशांच्या गुप्तचर संस्थानी रशिया एक नवीन सॅटेलाईट शस्र विकसित करत असल्याचा दावा केला आहे. या शस्रास्राचा संभाव्य टार्गेट उद्योजक इलॉन मस्क यांची स्टारलिंक सॅटेलाईट सर्व्हीस असू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. स्टारलिंकने युक्रेनला रशियाच्या विरोधात सुरु असलेल्या युद्धात मोठी तांत्रिक मदत केलेली आहे. यामुळे रशिया याला पाश्चिमात्य देशांची अंतराळातील ताकदीचा महत्वाचा हिस्सा मानत आहे.

गुप्तचर रिपोट्सनुसार हे नवीन शस्र झोन-इफेक्ट तंत्रावर आधारित असू शकते. यात अंतराळात हजारो छोटे आणि वजनी धातूचे छर्रे(पेलेट्स) सोडले जातील. हे छर्रे स्टारलिंकच्या सॅटेलाईट्सच्या ऑर्बिटमध्ये पसरले जातील. हे पेलेट्स एक साथ अनेक सॅटेलाईट्सला नुकसान पोहचवू शकते. यात स्टारलिंक नेटवर्कला मोठा हिस्सा एक साथ ठप्प होऊ शकतो.

या शस्रास्राचे नुकसान काय ?

तज्ज्ञांच्या मते असे शस्रास्रे वापरणे खूपच खतरनाक होईल, छर्रे टाकल्याने त्याचा मलबा केवळ स्टारलिंकलाच नव्हे तर अंतराळातील दुसऱ्या देशांच्या आणि कंपनीच्या सॅटेलाईट्सला देखील नुकसान पोहचवू शकते. यात रशिया आणि त्याचा सहयोगी चीन देखील सामील आहे. जो कम्युनिकेशन, डिफेन्स आणि टेहळणीसाठी हजारो सॅटेलाईट्सवर अवलंबून आहे.स्पेस सिक्युरिटी एक्सपर्ट व्हीक्टोरिया सॅमसन यांचे म्हणणे आहे की त्यांना अशा प्रकारच्या शस्रावर विश्वास नाही. त्यांच्या मते असे पाऊल अंतराळात बेकाबू परस्थिती तयार करु शकते आणि स्वत: रशियालाही त्याचा फटका बसेल.

कॅनडाच्या सैन्याच्या स्पेस डिव्हीजनचे चीफ ब्रिगेडियर जनरल क्रिस्टोफर हॉर्नर यांनी अशी शक्यता पूर्णपणे नाकारली जाऊ शकत नाही. जर रशियाने अंतराळात अण्वस्रासारख्या शस्राचा पर्यायावर विचार करु शकतो तर याहून कमी धोकादायक शस्रावर काम करु शकतो.

रशियाने या आरोपांवर काही अधिकृत उत्तर दिलेले नाही. याआधी रशियाने संयुक्त राष्ट्रात अंतराळात शस्रास्रे तैनाती रोखण्यावर मागणी केलेली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही रशियाचा अंतराळात अण्वस्र तैनात करण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रशियाने सॅटेलाइट्सना टार्गेट करणारी सिस्टीम बनवली

या महिन्यात रशियाने दावा केला आहे की त्यांनी S-500 नावाची नवी ग्राऊंड बेस्ड मिसाईल सिस्टीम तैनात केली आहे. जी खालच्या ऑर्बिटमधील सॅटेलाईट्सना टार्गेट करु शकते.परंतू सध्या ज्या शस्राची चर्चा सुरु आहे ते यापेक्षा भिन्न आहे. कारण हे शस्र एकाच वेळी अनेक सॅटेलाईट्सना निशाना करु शकते. धोकादायक म्हणजे हे छर्रे इतके लहान असतील की त्यांना ट्रॅक करणे अवघड असेल. यामुळे कोणा हल्ल्याचा जबाबदार देश शोधणे कठीण होऊ शकते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरामध्ये गंगाजल ठेवलयं? ‘या’ नियमांचे काटेकोर पालन करावे
  • TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 7 ते 9 मधील विजयी उमेदवार कोण?
  • स्टारलिंक रशियाच्या टार्गेटवर ? इलॉन मस्क चिंतेत, अमेरिकेत खळबळ
  • Under 19 Asia Cup: आशिया कप विजेत्या संघाला किती प्राईज मनी? प्रत्येक खेळाडूला इतकी रक्कम
  • Silver Rate : एका दिवसात 7000 हजारांची वाढ, चांदीला एवढी झळाळी का? अखेर खरं कारण समोर?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in