
संपूर्ण जगात पाकिस्तानची बदनामी झालेली आहे. आता सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) पाकिस्तानी नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या दोन्ही देशांनी आपल्या देशातून 50000 पेक्षा जास्त पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावले आहे. यामुळे पाकिस्तानची जगात किंमत काय आहे हे समोर आले आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यावर बोलताना म्हटले की, ‘ही प्रवृत्ती पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब करत आहे.’ सौदी अरेबियाने अंदाजे 56 हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांना देशाबाहेर हाकलले आहे. तसेच युएईनेही व्हिसा नियम कडक केले आहेत. गेल्या महिन्यापासून युएईने बहुतेक पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद केले आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तानी लोक या देशांमध्ये जातात आणि गुन्हेगारी कारवाया करतात किंवा भीक मागतात. हे संकट टाळण्यासाठी दोन्ही देशांनी ही कारवाई केली आहे.
पाकिस्तानने लोकांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले
दुसरीकडे, पाकिस्तानने मानवी तस्करी रोखण्यासाठी आणि दुसऱ्या देशात जाऊन भीक मागण्याच्या तयारीत असलेल्या 50 हजार लोकांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले आहे. आगा रफीउल्लाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय असेंब्लीच्या परदेशी पाकिस्तानी आणि मानवाधिकार स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक रिफत मुख्तार रझा यांनी संसदीय पॅनेलला माहिती देताना म्हटले की, “या वर्षी विविध विमानतळांवर किमान 50 हजार लोकांना परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले आहे. यापैकी बरेच लोक युरोप आणि सौदी अरेबियाला जाण्याचा प्रयत्न करत होते. यातील बऱ्याच लोकांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती.
या देशांनीही पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलले
सौदी अरेबियानंतर युएईनेही 6000 पाकिस्तानींना हाकलून लावले आहे. अझरबैजाननेही 2500 पाकिस्तानी भिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. रझा पुढे बोलताना म्हणाले की, या वर्षी 24000 पाकिस्तानी कंबोडियाला गेले होते, मात्र त्यापैकी 12000 लोक अद्याप परतलेले नाहीत. तसेच 4000 लोक पर्यटक व्हिसावर म्यानमारला गेले होते, मात्र यातील 2500 लोक अद्याप परतलेले नाहीत. दरम्यान, युरोपमध्ये बेकायदेशीर स्थलांतर कमी झाले आहे, गेल्या वर्षी 8000 पाकिस्तानींनी बेकायदेशीरपणे युरोपात प्रवास केला होता, मात्र यावर्षी 4000 लोक बेकायदेशीरपणे युरोपात गेल्याचे समोर आले आहे.
Leave a Reply