
जगातील अनेक देशांत मद्यविक्रीवर बंदी आहे. पण आता सौदी अरेबियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सौदी अरेबियात मद्यविक्री केली जाणार आहे. पण मद्य खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आता सॅलरी स्लीप दाखवावी लागणार आहे. सॅलरी स्लीप असेल तरच तुम्हाला तिथे मद्य खरेदी करता येणार आहे.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आता सौदी अरेबियात मद्यविक्रीच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. या बदललेल्या नियमानुसार आता सौदी अरेबियामध्ये परदेशी नागरिकांना मद्याची खरेदी करता येणार आहे. पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार मद्यविक्रीच्या दुकानावर तुम्ही सॅलरी स्लीप दाखवल्याशिवाय तुम्हाला मद्य दिले जणार आहे.
विशेष म्हणजे तुमच्या सॅलरीवर 50 हजार रियाल म्हणजेच 13300 डॉलर्सपेक्षा कमी पगार असेल तर तुम्हाला मद्य दिले जाणार आहे. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास औदी अरेबियात तुम्हाला मद्यखरेदी करायची असेल तर तुमचा पगार प्रतिमहिना 12 लाख रुपयांपेक्षा कमी नसायला हवा.
सौदी अरेबियात तुम्हाला सॅलरी स्लिप दाखवून तुमची कमाई सिद्ध करावी लागणार आहे. अगोदर रियादमध्ये फक्त परदेशी राजनयिक अधिकाऱ्यांसाठी मद्यविक्रीची दुकाने चालू करण्यात आली होती. आता येथे गैर-मुस्लिमांनाही मद्याची विक्री केली जात आहे.
सौदी अरेबियाने हा निर्णय घेण्यामागे एक रणनीती असल्याचे बोलले जात आहे. या देशाला तेथे असलेल्या सामाजिक बंधनांना कमी करायचे आहे. या नियमांत शिथिलता दिल्याने त्या देशात गुंतवणुकीला चालना मिळेल, असा तेथील सरकारचा उद्देश आहे.




Leave a Reply