• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सिग्नल शिवाय विना कटकट, ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या 25 मिनिटांत गाठता येणार

December 1, 2025 by admin Leave a Comment


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए ) मुंबईच्या पायाभूत विकासासाठी आणखी एक क्रांतीकारण पाऊल उचलले आहे. मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर,घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंतच्या विस्तारीकरणाचे (Elevated Eastern Freeway Extension) बांधकाम सुरू केले आहे.एकूण १३.९० किमी लांबीच्या या पूर्णपणे उन्नत अशा सहा पदरी हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास हा अवघ्या २५-३० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

हा कॉरिडॉर आनंद नगरपासून मुलुंड, ऐरोली, JVLR, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे जाणार असून शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रुतगती महामार्गावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीची त्यामुळे सुटका होणार आहे. हा महामार्ग दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे.

ठाण्यात हा प्रकल्प आनंद नगर ते साकेत उड्डाण पुलाजवळ मुलुंड ऑक्ट्रोय नाका येथे आणखी एका उन्नत कॉरिडॉरशी सुलभपणे जोडला जाणार आहे. ज्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. याशिवाय समृद्धी महामार्गाशी देखील हा उन्नत मार्ग जोडला जाणार आहे.

एमएमआरडीएच्या शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून तसेच तज्ञ आणि पर्यावरणप्रेमी यांच्याशी विचारविनिमय करून याआधी प्रकल्पाचा विक्रोळी ते घाटकोपर पट्टा पुनर्रचित करण्यात आला आहे. त्यामुळे १२७ पिंक ट्रम्पेट वृक्ष वाचवले गेले आहेत. त्याचप्रमाणे भरपाई लागवड स्वरूपात एकूण ४,१७५ नवी झाडे लावली जाणार आहेत.

उन्नत विस्तारीत मार्गाची मुख्य वैशिष्ट्ये :

✔ MMR मधील उन्नत रस्त्यासाठी पहिल्यांदाच सिंगल पाईल, सिंगल पियर प्रणाली

✔ मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे २ पदरी अप-डाऊन रॅम्प

✔ नवघर उड्डाणपूल येथे ३+३ पदरी उन्नत टोल प्लाझा

✔ अखंड, सुरक्षित आणि हाय-स्पीड प्रवासासाठी डिझाईन

स्थिती अहवाल :

* प्राथमिक सर्व्हेची कामे पूर्ण

* टेस्ट पाइल्स पूर्ण

* भू-तांत्रिक तपासणी जवळपास पूर्ण

* युटीलिटी ओळखण्याचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण

* वर्किंग पाइल्स आणि पियर कास्टिंग प्रगतीपथावर



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे खरमास, यादरम्यान करू नका ‘ही’ 4 शुभ कामे
  • मोठी अपडेट! मला मृत्यू द्या नाही तर… इमरान खानची मुनीर सरकारकडे थेट मागणी
  • माही सोबत घटस्फोटाच्या चर्चा… दुसऱ्याच तरुणीसोबत जय भानुशाली स्पॉट… काय आहे व्हायरल फोटो मागील सत्य?
  • श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव, भक्तांसाठी कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण
  • Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे…लाडक्या बहिणींच्या पैशांचे…आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, शिंदेंना डिवचलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in