
नांदेड शहरातील सक्षम ताटे याची हत्या आचल मामीडवार हिच्या कुटुंबियांनी केली. सक्षम आणि आचल यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, याची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली आणि थेट सक्षमचा काटा काढण्यात आला. सक्षमची हत्या करण्यापूर्वी आचल हिच्या भावाने सक्षमला समज देत बहिणीपासून दूर राहण्यास सांगितले होते. त्यापूर्वी घरच्यांच्या दबावाखाली 18 वर्ष पूर्ण होण्या अगोदर आचल हिने सक्षमवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती स्वत: पोलिस ठाण्यात जात सक्षमवरील गुन्हा मागे घेतला. सक्षमच्या वडिलांनी आणि दोन भावांनी थेट सक्षमवर गोळीबार केला. मात्र, तरीही तो पळत असल्याचे पाहून थेट फरशी घालत त्याची हत्या केली. यादरम्यान आचलला सक्षमच्या हत्येची कोणतीही कल्पना नव्हती.
देवदर्शनाला जात असल्याचे सांगून तिला परभणीला नेण्यात आले. आचल मामीडवार हिच्या कुटुंबाची आणि सक्षम ताटे याचेही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. सक्षम याच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई देखील केली होती. सक्षम याच्या हत्येबद्दल आचलला पेपरमधील फोटो पाहून समजले. हेच नाही तर तिने थेट सक्षमच्या मृतदेहासोबतच लग्न केले. सक्षम गेल्यानंतर तिने त्याला हळदही लावली.
आचल मामीडवार हिने सांगितले की, सक्षम या जगात नसला तरीही आयुष्यभर मी त्याची बायको म्हणून जगणार आहे. सक्षम ताटे प्रकरणातील आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. दोन पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आली. आता सक्षम ताटे याचे कुटुंबिय आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. नुकताच आचल मामीडवार हिने थेट पोलिसांनाच मोठा इशारा दिला आहे.
आचल मामीडवार हिने म्हटले की, आता यांनी जर काही अॅक्शन घेतली नाही तर आम्ही दाखवणार आमच्याकडे शेवटचा पर्याच तोच आहे. आमचा सक्षम गेलेला आहे तर आम्हाला मरणाची काहीच भीती नाहीये. कारण जगण्याचे कारणच गेले नं.. त्याला न्याय मिळून देण्यासाठी आता आम्ही काहीही करणार. यावेळी ती डीवायएसपींबद्दलही बोलताना दिसली. त्या दोन पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे असे आचल हिने म्हटले.
Leave a Reply