
लवकर उठा : जगातील बहुतेक अब्जाधीश सूर्योदयापूर्वी उठतात. यामुळे त्यांना व्यायामासाठी, नियोजनासाठी आणि शांतपणे विचार करण्यासाठी इतरांपेक्षा जास्त वेळ मिळतो. हा वेळ त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्रिय बनवतो.
सतत शिकत रहा : श्रीमंत लोक कधीही शिकणे थांबवत नाहीत. ते दररोज किमान 30 मिनिटे पुस्तके वाचतात किंवा नवीन कौशल्ये शिकतात. ज्ञान हेच संपत्ती वाढवण्याचे सर्वात मोठे साधन आहे, असे ते मानतात.
उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत : केवळ एका पगारावर अवलंबून राहणे धोक्याचे असते. श्रीमंत लोक एकाच वेळी नोकरी किंवा व्यवसायासोबत शेअर्स, रिअल इस्टेट किंवा साइड बिझनेस यांसारख्या उत्पन्नाच्या अनेक मार्गांवर काम करतात.
गुंतवणूक : श्रीमंत होण्यासाठी आधी ठराविक रक्कम गुंतवणुकीसाठी बाजूला काढा आणि उरलेल्या पैशात खर्च भागवा. नुसते पैसे साठवून कोणी श्रीमंत होत नाही, तर ते योग्य ठिकाणी गुंतवून श्रीमंत होता येते.
वेळेचे व्यवस्थापन : श्रीमंत व्यक्तींसाठी वेळ हा पैशापेक्षा जास्त मौल्यवान असतो. ते आपला वेळ फालतू गप्पा, सोशल मीडिया किंवा टीव्हीमध्ये वाया घालवत नाहीत. ते आपला वेळ अशा कामांत गुंतवतात ज्यामुळे त्यांना काहीतरी मिळेल.




Leave a Reply