• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘शोले’ ची झाली होती जेथे शुटींग, तेथील ही 5 ठिकाणे पाहिली आहेत का ?

November 28, 2025 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपटसृष्टीतील शोले चित्रपटाला माईल स्टोन म्हटले जाते. या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवणारे काही कलाकार आज जगात नाहीत. त्यातील वीरुची भूमिका करणारे अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले आहे. धर्मेंद्र यांचा वयाच्या ८९ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. शोले चित्रपटातील अभिनेते, डॉयलॉग्ससोबत आणखी एक गोष्ट गाजली ती म्हणजे रामगड हे गाव…

गाजलेल्या शोले चित्रपटातील हे रामगड प्रत्यक्षात कर्नाटकातील रामनगर आहे. या गावात शोलेचे चित्रीकरण झाले होते. आजही या गावात शोलेचे चाहते शुटींगची स्थळे पाहायला गर्दी करतात. परंतू या रामनगरच्या आजबाजूलाही अनेक पर्यटनासाठी चांगली ठिकाणे आहेत. ज्यास तुम्ही एक्सप्लोर करु शकता. चला तर पाहूयात शोलेची शुटींग झाली त्या ( रामगड ) रामनगरच्या शेजारील चांगली स्थळे कोणती ?

कर्नाकटच्या रामनगरची खासीयत

शोलेचे रामगड म्हणजे रामनगर आता कसे दिसते आणि याचे काय वैशिष्टये आहे. ही जागा नैसर्गिक दरी आणि डोंगराळ कडे कपारीचा प्रांत आहे.हे गाव मंदिर आणि शांत परिसरासाठी ओळखला जातो. येथे शोलेची शुटींग लोकेशन पाहाता येतात. तसेच ट्रेकिंग, मंदिर दर्शन आणि
ऐतिहासिक स्थळांचे मिश्रण आहे.आजही ही जागा शांत आहे. परंतू आता येथे नव्या इमारती झाल्या आहेत. त्यामुळे ही जागा सुंदर दिसते. याच्या जवळील पाच ठिकाणे पाहूयात…

येथे पोस्ट पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Travelling__ soul (@travelling__souullll)

रामदेवरा बेट्टा

रामनगरच्या जवळच लोकप्रिय असा रामदेवरा बेट्टा नावाचा डोंगर आहे. हा नैसर्गिक दृश्ये आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. येथे डोंगरावर भगवान रामाचे एक तिर्थस्थळ आहे. येथे येण्यासाठी शिखरापर्यंत डोंगर चढावा लागतो, तो एक वेगळाच अनुभव आहे. येथे पोहचल्यानंतर निसर्गाचे वेगळेच रुप दिसते. डोंगरावर रामदेवरा बेट्टा गिधाडांचे अभयारण्य देखील असून ते पाहण्यासारखे आहे.रामनगर ते रामदेवरा बेट्टा हे अंतर केवळ २.५ किमी आहे.

श्री रेवन्ना सिद्धेश्वर बेट्टा टेकड्या

श्री रेवन्ना सिद्धेश्वर बेट्टा हिल्स या एसआरएस ३००० फूट उंचीवर स्थित एक अद्भूत स्थळ आहे. हे ठिकाण ओबडधोबड रस्ते आणि शानदार निसर्ग सौदर्यसाठी ओळखले जाते. डोंगरा ट्रेकिंग आणि नेचर लव्हरसाठी हे योग्य ठिकाण आहे. येथे श्री रेवन्ना सिद्धेश्वराचे मंदिराचे दर्शन घेऊ शकता. रामनगर श्री रेवन्ना सिद्धेश्वर बेट्टा डोंगर सुमारे १५ किमीवर आहे.

कब्बालादुर्ग किल्ला

कब्बालादुर्ग किल्ला कपल्ससाठी चांगले ठिकाण आहे. कब्बालादुर्ग ठिकाण कब्बालू गावाच्या जवळ एका ओबडधोबड खंडहर झालेला किल्ला आहे. ट्रेक करुन तुम्ही येथे पोहचू शकता. येथे किल्ल्यावरुन नजारा छान दिसतो. शिखरावर तुम्हाला मंदिरे आणि दुर्गम किल्ल्यात शांत वातावरण मिळेल. येथीस सनसेट देखील सुंदर दिसतो.हा किल्ला ऐतिहासिक आहे. हे एक कमी गर्दीचे शांत ठिकाण आहे.

येथे पोस्ट पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Travelling__ soul (@travelling__souullll)

चुन्ची फॉल्स

कनकपुराजवळ चुन्ची फॉल्स का एक सुंदर धबधबा आहे. याच्या आजुबाजूला घनदाट जंगल असून येथील हा धबधबा नैसर्गिक सौदर्यात भर टाकतो. येथे तुम्ही काही क्षण निवांतपणात वेळ घालवू शकता. मान्सूनमध्ये येथील सौदर्य दृष्ट लागण्या जोगे असते. गर्दीपासून दूर असलेल्या या ठिकाणी तुम्ही फोटोग्राफीची हौस पूर्ण करु शकता.

शोले शूटिंग प्वॉईंट

रामनगरला आला तर शोले चित्रपटाचे शूटिंग प्वाइंट अवश्य पाहा. येथील अनेक स्थळे तुम्हाला शोले चित्रपटातील लोकप्रिय सीनची आठवण करुन तुमच्या स्मृती जागृत करतील. येथील खडकात गब्बरचा आवाज घुमला होता.येथील डोंगर दऱ्यात गब्बर आणि ठाकूरचे डायलॉग घुमले होते याची आठवण तुम्हाला येईल. त्यामुळे जीवनात एकदा तरी येऊन हे स्थळ पाहूनच घ्या…





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे आहे जगातील सर्वात जास्त महागडं फळ, किंमत ऐकून घाम फुटेल, एका लक्झरी कारपेक्षाही जास्त किंमत
  • Chanakya Niti : आनंदी आयुष्यासाठी पती-पत्नीने रोज ही गोष्ट केलीच पाहिजे, चाणक्य काय म्हणतात?
  • Squash World Cup: 29 वर्षात भारताने पहिल्यांदाच मिळवलं जेतेपद, या खेळाडूंमुळे झालं शक्य
  • CIA चे हिमालयातील ते गुप्त मिशन, 60 वर्षानंतरही भारतासाठी का आहे धोकादायक ?
  • अपघातानंतर महिमा चौधरीचा चेहरा विद्रूप झाला होता; अनेक चित्रपट गमवावे लागले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in