• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शेख हसीना यांच्या घरवापसीसाठी हा मुस्लीम देश करतोय प्रयत्न,अशी लिहीली जातेय स्क्रीप्ट

December 1, 2025 by admin Leave a Comment


बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनानंतर सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांना पुन्हा ढाकाच्या राजकारणात लँड करण्याची तयारी केली जात आहे. यासाठी कतार हा देश मध्यस्ती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कतारची राजधानी दोहा या मध्यस्थतेचे मुख्य केंद्र बनले आहे. बांग्लादेशाच्या वतीने या डीलला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान हाताळत असून अलिकडेच ते भारतात आले होते.

नॉर्थ ईस्ट पोस्टच्या मते कतारचे माजी गुप्तचर प्रमुख हे काम करत आहेत. या सर्वांचा प्रयत्न हा शेख हसीना यांनी पुन्हा सत्तेत आणण्याचा आहे. परंतू वृत्तपत्राने हे सांगितलेले नाही की शेख हसीना यांच्या संदर्भात जी बातचीत होत आहे त्यास बांग्लादेशचे संपू्र्ण सरकार सामील आहे की नाही ? तसेच कतारचे सरकार कोणत्या पातळीवर या डीलमध्ये सहभागी आहे.

आधी आवामी लीगला रस्ता खुला करण्याचा प्रयत्न

कतारचे माजी गुप्तचर प्रमुख खुलैफी आणि खलीलुर रहमान यांच्यात गेल्या सात महिन्यात चार वेळा भेट झाली आहे. खलीलुर यांची भेट अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील झाली आहे. कतारचा पहिला प्रयत्न बांगलादेशात आवामी लीगसाठी रस्ता उघडण्याची आहे. म्हणजे बांगलादेशात आवामी लीगवर जी बंदी घातली आहे, त्यास सरकारने आधी उठवावे असा प्रयत्न आहे.

कतार आणि अमेरिका बांगलादेशातील निवडणूकात आवामी लीगने सहभाग घ्यावा या बाजूचे आहेत. खलीलुर यांच्याशी पहिल्या टप्प्यात याची मुद्यांवर बोलणी सुरु होती. वास्तविक शेख हसीना यांच्या गच्छंतीनंतर युनुस यांच्या अंतरिम सरकारने आवामी लीगवरील बंदी घातली होती. या बंदी मुळे आवामी लीग बांगलादेशातील निवडणूका उतरु शकत नाही.

शेख हसीना यांचे समर्थक याचा विरोध करत आहेत. अलिकडे शेख हसीना यांनी देखील एक वक्तव्य जारी केले होते. शेख हसीना यांनी म्हटले होते की जर त्यांच्या लोकांना निवडणूक लढू दिली नाही तर त्या रस्त्यावर याचा विरोध करतील.

अमेरिकीमुळे गेली शेख हसीना यांची खुर्ची

जुलै २०२४ मध्ये सरकारी नोकरीतील आरक्षणच्या मुद्यांवर बांगलादेशात शेख हसीना सररकारच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. हळूहळू हे आंदोलन उग्र झाले होते. शेख हसीना यांच्यावर १४०० लोकांना मारण्याचा आरोप आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले गेले त्यानंतर त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागला.

शेख हसीना यांच्या मते या आंदोलनामागे अमेरिका आणि पाकिस्तान होता. अमेरिकेला बांगलादेशाचे सेंट मार्टीन बेट हवे आहे.ज्यास हसीना यांनी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर अमेरिकेने त्यांच्या सरकार विरोधात बंड करवले.

परंतू डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यानंतर बांगलादेशाचे राजकारण ३६० डिग्री फिरले आहे. ट्रम्प यांना बांगलादेशातील राजकारणात थेट दखल देण्यास इन्कार केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महिलांच्या बाबतीत मी संत नाही, माझ्या काही… शरीरसंबंधांवर अक्षय खन्नाच्या वडिलांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य
  • जगात कधीच असं घडलं नसेल… एकाच कुटुंबातील पाच जणांवर अंत्यसंस्कार चालू होते, तेवढ्यात ढसाढसा रडणाऱ्या तरुणाला… काय घडलं स्मशानभूमीत?
  • EPFO मधून एका वेळी किती पैसे काढता येतात?, पाहा संपूर्ण अपडेट
  • मोठी बातमी! महापालिका निवडणुकीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे थेट विधान, म्हणाले, महायुतीचा..
  • Ajit Pawar : मोठी बातमी… पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक? अनौपचारिक गप्पांमध्ये अजित दादांनी काय म्हटलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in