• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिवचरित्रातील थरारक अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’चा टीझर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण?

December 16, 2025 by admin Leave a Comment


छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या तेजस्वी पराक्रमासोबत त्यांचं बुद्धिचातुर्य हा त्यांच्या संपूर्ण कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी योद्धे होते. असंख्य मोहिमांमधून ते अनेकदा सिद्ध झालं आहे. महाराजांनी गनिमी कावा ही कूटनीती अत्यंत प्रभावीपणे वापरली. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा, ही पद्धत तर महाराजांनी अनेक वेळा अतिशय यशस्वीरीत्या वापरली. औरंगजेबाचं मुघल साम्राज्य सर्वात मोठं आणि मजबूत साम्राज्य मानलं जायचं. अशा या साम्राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ जोरदार हादराच दिला नाही, तर मुघल सम्राट औरंगजेबाची झोपही त्यांनी उडवली.

आग्य्राला जाण्याचं निश्चित करणं आणि भर दरबारात मुघल साम्राज्याला निडरपणे आव्हान देणं हा स्वराज्याच्या उभारणीतील महत्त्वाचा अध्याय आहे. यात राजांची विचारसरणी, तल्लख बुद्धीमत्ता, गनिमी कावा, प्रसंगावधान राखून आखलेली रणनीती, शत्रूला गाफील ठेवून रक्ताचा एक थेंब ही न सांडता केलेला पराभव आदी गुण दिसतात. शिवचरित्रातील हा थरारक अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ भव्य चित्रपटातून शिवजयंतीदिनी 19 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झालं. या संकल्पनेतील सहावं चित्रपटरुपी पुष्प ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. औरंगजेबाच्या बलाढ्य मुघलसत्तेचा पोलादी पहारा भेदून महाराजांनी घेतलेली मोठी जोखीम, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंग याची रोमांचकारी झलक या टीझरमधून दिसून येत आहे.

पहा टीझर-

पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचं आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा,आलोक शर्मा (मुगाफी) आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही हार मानली नाही. त्यांच्या शौर्याची, धैर्याची आठवण करून देत इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हा प्रेरणादायी अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या माध्यमातून भव्य स्वरूपात आणण्याचा आनंद दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मृत्यू होताना व्यक्तीच्या बाजूला ठेवा या दोन वस्तू, गरुड पुराणात सांगितलंय असं काही की…
  • अमेरिकेत 2BHK चे भाडं किती? डिपॉझिट आणि ब्रोकरेजचं गणित काय? जाणून घ्या
  • फोन वाजला, तुम्ही कॉल घेतला परंतू आवाज नाही आला ? स्कॅमरचे आता नवे तंत्र
  • माझे शरीर सुजले होते, प्रेग्नेंसी मोठा झटका होता…’ राधिका आपटेने तिला प्रेग्नेंसीवेळी आलेला तो अनुभव सांगितला
  • 2025 मधील शेवटचा प्रदोष कधी? 17 की 18 डिसेंबर? जाणून घ्या..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in